Blogभक्ति

श्री वृद्धेश्वर येथील महादेवाच्या मंदिराला म्हातारदेव म्हणतात जाणून घ्या ! | vruddheshwar temple 1

वृद्धेश्वर मंदिर मित्रांनो चला तर जाणून घेऊया कि घाटशिरस येथील महादेवाच्या देवस्थानाला वृद्धेश्वर किंवा म्हातारदेव असे का म्हणतात.

मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली हे नक्कीच Comment करून सांगा. आणि आमच्या Whatsapp आणि Telegram Channel ना Subscribe करण्यासाठी त्यावर क्लिक करा. आम्ही अशाच प्रकारची नवनवीन माहिती देत राहू. धन्यवाद !!!!

अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस गावातील वृद्धेश्वर म्हणजेच म्हातारदेव गर्भागिरीच्या कुशीत वसलेलं हे देवस्थान ! या ठिकाणी महादेवांनी वृद्ध रुपामध्ये देवांच्या पंगतीला तूप वाढल होत. व नंतर महादेवांनी याच ठिकाणी वास्तव्य केले अशी माहिती ग्रंथांच्या उल्लेखामधून मिळते. या वृद्धेश्वराचा उल्लेख ब्राम्ह्पुराना मध्ये सुद्धा आहे. त्यानुसार हे ठिकाण वृद्धा नदीच्या काठी वसलेले आहे. चला तर मग आपण येथील महत्व जाणून घेऊया.

अहमदनगरवरून पाथर्डीला जाताना करंजी घाट उतरला की देवराई गाव लागते. इथे उजवीकडचा रस्ता वृद्धेश्वरला जातो.  अत्यंत रम्य ठिकाण असलेल्या या गावी एक पुरातन शिव मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे गर्भगिरी डोंगर आहे. गर्भगिरी डोंगररांगेसह हा सर्व परिसर दंडकारण्य म्हणून परिचित होता.

मित्रांनो याआधीच्या लेखा मध्ये आपण मच्छिंद्र नाथांच्या मायंबा शी असल्येला संबंधाबद्दल माहिती पहिली मित्रांनो तुम्ही जर तो लेख वाचला नसेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करू माहिती नक्की वाचा म्हणजे तुम्हाला या लेखामधील माहिती चांगल्या रीतीने लक्षात येईल.

मच्छिंद्र नाथ उर्फ बडे बाबा यांचा इतिहास व मायंबा डोंगराशी असणारा लेख नक्की वाचा !

मित्रांनो मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ जेव्हा स्री राज्यामधून परत येत होते तेव्हा त्यांच्या सोबत मौनाकिनी राणीने दिलेली सोन्याची वीट देखील होती, ती वीट गोरक्ष नाथांनी फेकून दिली व नंतर हि गोष्ट मच्छिंद्रनाथांच्या लक्षात येताच ते गोरक्षनाथ महाराजांवर आक्रोश करू लागले. हे पाहून गोरक्षनाथांनी त्यांच्या समोरील गर्भारीरीचा डोंगरच सोन्याचा करून दाखवला व मच्छिन्द्रनाथांचा मोह घालवला पुढे मच्छिंद्र नाथांनी वृद्धेश्वर हे ठिकाण यज्ञासाठी ठरवले. त्यांच्या यज्ञासाठी ब्रम्हदेव, भगवान विष्णू, महादेवांसोबतच खूप देवदेवता उपस्थित होते. यज्ञ झाल्यानंतर अन्नदानाचा प्रसाद होता. त्यासाठी देवांच्या प्रसादाच्या रंग वृद्धेश्वर पासून ते देवराई या गावापर्यंत बसल्या होत्या. त्यामुळे त्या गावाचे नाव देवराई हे पडले. त्यावेळी या सर्व परिसराचे सडा संमार्जन 7 सटव्यांनी केले. त्याचबरोबर अष्टसिद्धींनी अन्नदानाचा प्रसाद बनवला. व प्रसन्ना देवी व जलदेवींनी जेवणाच्या पंगती वाढण्यास मदत केली. अष्टवसुंनी समाचार घेतला, भैरवनाथांनी म्हणजेच अष्टभैरव नाथांनी आठही दिशांना संरक्षण(पहारा) दिले. चित्रसेन, गंधर्व यांनी सर्वांना पानाचा विडा व भागीरथी व गंगेचे तीर्थ वाढले. यामध्येच अप्सरा व किन्नर गायन करत होते. आणि याच पंगती मध्ये महादेवांनी म्हातार्याच्या रुपामध्ये तूप वाढले. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते हे बघून गोरक्षनाथांना गहिनीनाथ महाराजांची आठवण झाली. व त्यांनी हि गोष्ट मच्छिंद्रनाथांना सांगितले असता गंधर्वाकडे निरोप देऊन तेथे बोलावले. गहिनीनाथ तेथे आल्यावर मच्छिंद्र नाथांनी मायेने गहीनिनाथांना आलिंगन घातले, व सर्वांना सांगितले कि गहिनीनाथ म्हणजे करभजन नारायणांचा अवतार होय.

चैतन्य कानिफनाथ महाराज मढीला कसे आले ! व मंदिर इतिहास जाणून घ्या. 

सगळीकडचा आनंद बघून महादेव म्हणाले कि, आता गहीनिनाथांना अनुग्रह देण्याची वेळ आलेली आहे, कारण हाच पुढे जाऊन पुढील अवतारांना अनुग्रह देणार आहे. त्यानंतर सर्व देवांच्या उपस्थिती मध्ये येथून जवळच असलेल्या म्हसोबाची वाडी या ठिकाणी गहीनीनाथांना ज्ञान देऊन अनुग्रह दिला.

मित्रांनो गोरक्षनाथांनी जो डोंगर सोन्याचा केला होता. तो कुबेरास अर्पण केला असं म्हणतात. कुबेराने तो डोंगर अदृश्य अस्राने झाकला व सांगितले कि मला जसे धन लागेल तसे मी येथून नेईल. या सोबतच मित्रांनो येथील जे महादेवाचे शिवलिंग आहे ते दर वर्षी वाढत जाते. म्हणूनच या देवस्थानाला वृद्धेश्वर असेही म्हणाले जाते. येथील शिवलिंगाला स्वयंभू मानल जात. हे शिवलिंग स्वयंभू असल्याचा दाखला देण्यासाठी महादेवांनी सांगितले कि येथील शिवलिंग हे दरवर्षी वृद्धिंगत होत राहील आणि मित्रांनो ते दरवर्षी होते देखील. मित्रानो येथील मंदिरामध्ये अष्टमहासिद्धींनाही नंदीच्या आधी स्थान दिलेलं हे एकमेव ठिकाण आहे.

मंदिर परिसर हा मनाला ऊर्जा देणारा आहे. पर्यटन साठी हा एक निसर्गाच्या सानिध्यातील रमणीय परिसर आहे. जवळच मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी – सावरगाव ( मायंबा ), मढी या गावामध्ये एका टेकडीवर कानिफनाथ महाराजांची संजीवन समाधी ,श्री मोहटा देवी मंदिर – मोहटा आहे. हे सर्व परिसर अतंत्य रमणीय असून डोंगर व निसर्गाच्या सानिध्यात आहेत. 

Vruddheshwar Mandir

तारकेश्‍वर गड, नागनाथ, गहिनीनाथ गड, अडबंगीनाथ गड, खरवंडी कासार येथील जनार्दन स्वामींची समाधी, भगवानगड, हरिहरेश्‍वर, समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेली हनुमानाची मूर्ती जिथे आहे, ते हनुमान टाकळी, शंखाचे मंदिर असलेली जोहारवाडी, लोहसरचा भैरवनाथ, मिरीचा विरोबा ही देवस्थाने श्री वृद्धेश्वर मंदिराजवळ आहेत.

तुम्हाला माहित आहे का? वृद्धेश्वर च्या मंदिराबाहेरील नंदीच्या मूर्ती समोर न बघता बाजूला का बघतात!

मित्रांनो ज्यावेळी मच्छिंद्रनाथांच्या आणि गोरक्षनाथांच्या आग्रहाने महादेवांनी येथील शिवलिंगामध्ये प्रवेश करण्याचे मान्य केले व ज्यावेळी त्यांनी त्या शिवलिंगामध्ये प्रवेश केला तेव्हा जो प्रचंड असा प्रकाश तयार झाला, त्यामुळे त्या नंदींनी बाजूला पहिले अस मानल जात.

त्यासोबत जेव्हा येथील यज्ञाला ३३ कोटी देवदेवता आल्या होत्या तेव्हा सर्व आपल्या पत्नी सोबत आले होते आणि त्यात नंदी आणि त्यांची पत्नी कामधेनु हे दोघे आले होते म्हणून येथे त्या दोघांच्या मुर्त्या आहेत असंही म्हणतात.

येथील स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या शिवलिंगा मध्ये जे पाणी आहे ते कधीही आटत नाही कारण ती शंकराच्या जटेतील स्वयंभू गंगा आहे.

वृद्धेश्वर च्या मंदिरामध्ये पार्वती मातेचीही मूर्ती आहे माहित आहे का कारण ?

मित्रांनो ज्यावेळी येथील मंदिरामधील शिवलिंगामधून जी गंगा वाहू लागली ती खूप तीव्र स्वरुपात वाहत होती म्हणून, पार्वती मातेला वाटले कि येथील लोकांना येथे आश्रय घेणे कठीण होईल म्हणून त्यांनी शंकरांना विनंती केली व त्यानंतर शंकरांनी त्या गंगेला संथ केले. व त्यावेळी पार्वतीमाता हि तिथेच थांबल्या म्हणून तेथे पार्वती मातेची मूर्ती आहे.

मकर संक्रांति च्या दिवशी या मंदिरा मध्ये फक्त महिलांनाच प्रवेश दिला जातो. येथील शिवलिंग म्हणजे महादेवाची जटा आणि येथील जे पाणी येते ते म्हणजे महादेवाच्या जटेतील गंगा होय. तसेच या मंदिरामध्ये ११ व्या शतकातील शिलालेख असलेली एक घंटा आहे. मित्रांनो हि घंटा प्राणदेव या राज्याने दिल्याचा उल्लेख आहे. मित्रांनो पुण्याच्या धनकवडी येथील शंकर महाराजांचे येथे १९३२ ते १९३६ च्याहोये काळामध्ये येथे वास्तव्य होते. व त्यांनी येथे साधना केली व त्यांना या ठिकाणी साक्षात महादेवांनी दर्शन दिले होते. येथे असलेल्या ज्ञानव्यापी विहिरीजवळ त्यांचे वास्तव्य होते. या सोबतच येथे अनेक साधू संतांचे वास्तव्य होते.

अशाच अनेक भक्तीमय रहस्यांच हे देवस्थान आहे.

वृद्धेश्वर मंदिर | वृद्धेश्वर मंदिर इतिहास | Vruddheshwar Map

मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली हे नक्कीच Comment करून सांगा. आणि आमच्या Whatsapp आणि Telegram Channel ना Subscribe करण्यासाठी त्यावर क्लिक करा. आम्ही अशाच प्रकारची नवनवीन माहिती देत राहू. धन्यवाद !!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *