वंजारी समाजाचे कुलदैवत | वंजारी समाज लोकसंख्या | वंजारी वधू वर माहिती | अन्न धान्याची वाहतूक करणारा समाज|
वाचून झाल्यावर इतरांना नक्की शेअर करा.

मित्रांनो चला तर आज जाणून घेऊ की कुठून आला वंजारी समाज.
वंजारी ही भारतातील हिंदू धर्मातील एक जात आहे. महाराष्ट्रात वंजारी समाज भटक्या जमाती-(ड) (NT-D म्हणजेच NT-3) मधे वर्गीकृत आहे. यवन आक्रमकांच्या त्रासाला कंटाळून इसवी सनाच्या १५-१६ व्या शतकात राजस्थान मधून दक्षिणेकडे स्थलांतरित झालेल्या विविध ३० (तीस) क्षत्रिय जाती जमाती पैकी ही एक जात होय. हा समाज ईशान्य भारत सोडून भारतातील सर्वच राज्यांत कमी जास्त लोकसंख्येत आढळतो. महाराष्ट्र राज्या बाहेरील वंजारी समाजाला तेथिल भाषेतील विविधते मुळे वंजारा, वंजरी संबोधले जाते. स्व. गणपत पांडुरंग संखे यांच्या महाराष्ट्र सरकार विरुद्ध मुंबई उच्च न्यायालया मधील प्रदीर्घ लढ्यामुळे वंजारी समाज OBC मधून (NT-3) म्हणजेच (NT-D) मधे वर्गीकृत केला गेला.
वंजारी कुळाची सुरवातीची काही माहिती.
वंजारी समाजाचा इतिहास हा त्रेतायुगापासून आहे. त्रेतायुगातील जमदग्नि ऋषि आणि रेणुका माता यांना 5 पुत्र होते.
- गंगाधर (रघुपती)
- दामोदर (अधिपती )
- मनुराज (कानिपती )
- देवराज (सुभानुपती )
- परशुराम
यामध्ये गंगाधरामुळे रावजीन वंजारी समाजाची उत्पत्ति झाली.
दामोदर पासून लाडजीन वंजारी या समाजाची उत्पत्ति झाली.
मनुराज पासून मथुरजीन वंजारी या समाजाची उत्पत्ति झाली.
देवराज पासून मूसारजीन वंजारी या समाजाची उत्पत्ति झाली.
या चार भावांपासून चार जाती म्हणजे लाडजीन, रावजीन, मूसारजीन, मथुरजीन, अशा चार जातीची निर्मिती झाली.
राजस्थान मध्ये वंजारी समाज हा महाराणा प्रतापसिंघ यांच्या सैन्यात प्रधान सेनापती म्हणून कार्यरत होता. श्री भल्लसिंघ वंजारी व श्री फत्तेसिंघ वंजारी हे महाराणा प्रतापसिंघचे प्रधान सेनापती होते. त्यांच्या समाधी आजही उदयपूर राजस्तान मध्ये आहे.राजस्थानात असतांना हा समाज कडवा लढवय्या क्षत्रिय म्हणून ओळखला जात होता. आजही राजस्थानात हा समाज मोठ्या प्रमाणात आढळून येतो. यवन आक्रमणांमुळे त्रस्त होऊन दक्षिणे कडे स्थलांतरित झाला. आणि व्यापार उदीम करू लागला. दळणवळण साधनांचा शोध लागण्यापूर्वी पुरातन काळापासून मालवाहतुक/मालपुरवठा करण्याचे काम वंजारी समाज करत असे. महाराष्ट्रात आल्यावर शिवाजी महाराजांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात वंजारी होते.पूर्वीच्या काळी वंजारी समाज मालवाहतूकीसह व्यापारही करत असे.
आजही वंजारी समाजातील काही लोक तांड्यामध्ये राहतात जसे की भुसारजीन वंजारी समाज त्यांनाच बंजारा समाज अस ओळखल जात.
रावजीन वंजारी समाजाच वास्तव्य हे जास्त प्रमाणात अहमदनगर, बीड यांसारख्या जिल्हयामध्ये आहे.
पूर्वी रावजीन वंजारी हा समाज जेनुयुधारी समाज होता. वंजारी समाज हा मूलतः पूर्णपणे शाकाहारी होता. या समाजात एक नियम होता की सोमवार कहा दिवस हा पुरुषांचा उपवास असायचा आणि मंगळवार चा दिवस हा महिलांचा उपवास असायचा.
पूर्वीच्या काळी वंजारी समाज हा व्यापार करायचं यामध्ये मुख्यतः हीरे, मोती, जेवरात, खारीक,खोबरे,बदाम,इलायची यांसारख्या मालाचा व्यापार वंजारी समाज करायचा. हत्ती, घोडे,उंट ही त्याच्या वाहतुकीची साधन असायची. हा समाज पूर्वी तांड्यामध्ये राहत असायचा. वाहतुकीच्या काळी हा समाज वनांमध्ये राहायचा त्यामुळे या समाजाला रावजीन वंजारी समाज असे म्हणू लागले.
पूर्वीच्या काळी जय भागात दुष्काळ पडत असे तेथे हा समाज धान्य पुरवठा करत असे.
रावजीन वंजारी समाजाच मूळ गाव हे राजस्थान मधील करोली हे आहे. त्यानंतर ई. स. 1294 मध्ये या समाजातील लोक करोली गावातून दक्षिण भारतातील माहुरगड येथे स्थलांतरित झाले. त्यानंतर हा समाज वेगवेगळ्या भागांमध्ये विस्तारीत झाला.
महाराणा प्रताप यांचे सैनापती मल्ला हे जातीचे वंजारी होते.
समाजाची आजची स्थिति.
आज महाराष्ट्रातील मुठभर गर्भश्रीमंत लोक सरकारी अधिकारी कर्मचारी व्यावसायिक सोडले तर वंजारी समाजाची अवस्था अवांच्छित समाजघटक अशी बनली आहे.
चार पोटजातीत विभागलेला हा वंजारी समाज संत श्री भगवान बाबा (भगवानगड, ता पाथर्डी जी अहमदनगर) व लोकनेते गोपीनाथजी मुंढे यांच्या प्रयत्नांमुळे संघटित झाला आहे.या महापुरुषन मुळे आज संपूर्ण वंजारी समाज एक झाला आहे. व येणाऱ्या काळात संपूर्णन भारतभरात असलेला वंजारी समाज एक होताना दिसत आहे. मुंडे यांना वंजारी समाज नेता मानतो.
वंजारी समाजाच कुलदैवत कोणते?
मित्रांनो वंजारी समाजाच कुलदैवत हे देवी रेणुका माता आहे. त्यामुळे आपण नक्कीच माहुरगडच्या रेणुका मातेच्या दर्शनाला जायला हवे. रेणुका माता आपल कुलदैवत असण्याच कारण म्हणजे आपण सर्व रेणुका मातेचे वंशज आहोत. आपली उत्पत्ति ही रेणुका मातेपासून झाली आहे.
वंजारी समाजाची आडनावे | वंजारी समाज गोत्र.
लाडजीन वंजारी बाबत
१) कुळी – गंभीरराव (शिर्के), वेद – ऋग्वेद , गोत्र – शौनक
उपनावे – उमाळे, कताले, कावळे, काळटोपे, कुकडे, कोराळे, खरमाटे, खिल्लारे, गवते, गोमासे, गोपाळकर, गंदीले, गंदास-गंधास, चराटे, चाबुकस्वार, चेवले, जरे, डमाळे, डुकरे, ढोले (डोहले), ताडगे, तांबडे, दराडे, नाईकवाडे, नवाळे, नाकाडे, नागरगोजे, नागरे -नांगरे, नेहरकर, पाखटे, पालवे, पोटे, फटकळ, फुंदे, फडे, वहांगे, भांगे, बारगजे, बिकट, बिनावडे (बिनवडे), बरके, बैळगे-बेळगे, बोंद्रे, लादे, लामण, लांडगे, लैंडखैरे, वारे, शेकडे, शेळके, शेरेकर, सारूक-सारुके, सळटे, सोसे, सांगळे, हांगे.
कुळी – प्रतापराव (मुंढावच्छाव) धामपाळ, वेद – यजुर्वेद, गोत्र – अत्री
उपनावे – आरबुज, कतने, कताने, कतखडे, कतारे, खडवगाळे, खेडकर, खोजेपीर, खोकले, खंदारे, गर्जे, गंदवे, गोलार, गवते, घरजाळे, घोडके, चवरे, चेपटे, ठुले, डोंबरे, ढगार, तोगे, दगडखैर, दहिफळे, धज, धुपारे, नेहाळे, पटाईत, पाळवदे, बरवडे, बडे – बढे, वदने, वालटे, वरवडे, वागादि, वमाळे, बोकारे, भटाने, भाताने, मुंडे – मुंढे, मानकर, मिसाळ, मोरुळे – मोराळे, लकडे, लव्हारे, होळंबे, वमळे (वमाळे), विघ्ने, सोशे, साठे, शिरसाठ, सोनपीर, सातभाये.
कुळी – चंद्रराव ( मोरे – मौर्य ), वेद – यजुर्वेद , गोत्र – गौतम – ब्रम्ह
उपनावे – इगारे, इधारे, उंबरे, काकड, लहाने (लहाणे), सानप.
कुळी – गरुडराव, वेद – ऋग्वेद , गोत्र – कश्यप
उपनावे – आंधळे, कांगणे, कुसपटे, केंबरे, केंद्रे, गोंगाणे, घोळवे, चौधर, जाधवर, जायफळ, तांदळे, दूधवरपे, भंडकर, मैंद.
कुळी – पवारराव, वेद – यजुर्वेद , गोत्र – भारद्वाज शुक
उपनावे – आंबले, आंबाले (आंबाळे), उगले, उगलमुगले, उजाडमुळ्गे, कडपे, चिपाटे, बोडके, बारगळ, मुसळे, पवार, पंडित, लटपटे, वनवे, विंचू.
कुळी – जगतापराव (जगताप), वेद – यजुर्वेद , गोत्र – कश्यप
उपनावे – कांदे, कुटे, गंगावणे, दोंड – दौंड, धात्रक, धायतिडीक, मुरकुटे, राख, हेकरे.
कुळी – भालेराव (यादव), वेद- यजुर्वेद, गोत्र – पराशर / कौडिण्य
उपनावे – खाडे, चौले, डोंगरे, बांगर.
कुळी – प्रचंडराव (जाधव), वेद- यजुर्वेद, गोत्र – कश्यप / विश्वामित्र
उपनावे – आव्हाड, इंदूरकर, काळे, काळकाटे, जायभावे, डोंबाळे, डोमाळे, दापुरकर, बोंदर, शिंत्रे, हाडपे.
कुळी – भगवंतराव, वेद- ऋग्वेद, गोत्र – जमदग्नी
उपनावे – काळवझे, ताटे, फड(सौंदनकर), मगर.
कुळी – बळवंतराव, वेद- ऋग्वेद, गोत्र – कश्यप
उपनावे – इपर – ईप्पर, चकोर, दरगुडे – दरगोडे, लाटे, सगळे, हेंबाडे.
कुळी – तवरराव (तोवर), वेद- यजुर्वेद, गोत्र – गार्गायण
उपनावे – केकाण – केकाणे, थोरवे, भाबड, भोके, मानवते.
कुळी – अंकुशराव, वेद- ऋग्वेद, गोत्र – कश्यप
उपनावे – गरकळ, टाकळस, डोईफोडे, डोळे, वरशीड, मरकड.
कुळी – सुखसराव, वेद- ऋग्वेद, गोत्र – कश्यप
उपनावे – कराड (कराडे), कातकाडे, खपले, खांडेकर, खांडवेकर, गुटे, *गंडाळ,* चकणे, पानसरे, बुरकुल – बुरकुले, भाळवे – माळवे, साबळे, सोनावणे, हुळळे, निमोनकर.
कुळी – पतंगराव, वेद- ऋग्वेद, गोत्र – कश्यप
उपनावे – आघाव, दिघोळे – डिघोळे, गुजर, शेवगावकर.
कुळी – पंचमुखराव, वेद- यजुर्वेद, गोत्र – कपील
उपनावे – कथार, कापसे, कीर्तने, जवेर – जवरे, दोदले, डोळसे, ढाकणे, बोदले, लोखंडे, वाघ.
कुळी – हैबतराव (लाड), वेद- ऋग्वेद, गोत्र – कश्यप
उपनावे – केदार,गामणे – गाभणे, गोरे, सिताफळकर.
कुळी – मानकरराव, वेद- ऋग्वेद, गोत्र – वसिष्ठ / कौशिक
उपनावे – चाटे, वायमासे, पायमासे – पायभासे, पवासे – पंबासे.
कुळी – यशवंतराव (गायकवाड), वेद- ऋग्वेद, गोत्र – कश्यप
उपनावे – गायकवाड, घुगे, तारे, देवरंगे, गोगे.
कुळी – देवराय , वेद- ऋग्वेद, गोत्र – वसिष्ठ / कपील
उपनावे – इलग – विलग, घुले, वडगे, झडग.
कुळी – सुलतानराव (चव्हाण), वेद- ऋग्वेद, गोत्र – कश्यप / पुलस्थ
उपनावे – काकडे, काळे, गिते, बुदवंत – बुधवंत, *शेप*, कापडी,चकोर, कापडे, शेपाक, कळी – काळी.
कुळी – तोंडे, वेद- ऋग्वेद, गोत्र – कश्यप / मकन
उपनावे – तोंडे.
कुळी – तिडके, वेद- ऋग्वेद, गोत्र – कश्यप / दुर्वास
उपनावे – तिडके.
कुळी – लाड, वेद- ऋग्वेद, गोत्रज – कश्यप / मांडव्य
उपनावे – लाड.
कुळी – वेद- ऋग्वेद, गोत्र – कश्यप
उपनावे – हुळळे, हुळहुळे, लंग, जमाडे, नवाळे, पवार, हुशे
मित्रांनो अशाच अजून माहिती साठी I Love Pathardi ला टेलेग्राम वर जॉइन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Telegram Link:- https://t.me/ilovepathardii