जाणून घेऊया समान नागरी कायद्यामुळे होणारे बदल त्यासोबतच UCC बद्दल चाललेल्या अफवा.
सर्वप्रथम जाणूया समान नागरी कायद्ययाबद्दल च्या अफवा. :-
१. समान नागरी कायद्यामुळे आरक्षण रद्द होईल. तर मित्रांनो समान नागरी कायद्याचा आणि आरक्षणाचा दूरदूर पर्यन्त काही संबंध नाहीय. तसेच या कायदयान्वये नोकरी शिक्षण आणि राजकीय आरक्षणाशी कोणताही संबंध नाही.
२. समान नागरी कायद्यामुळे सर्वांना समान कर (TAX) भरावा लागेल. ही पण पूर्णपणे अफवा आहे कारण भारतामध्ये टॅक्स हा आर्थिक उत्पन्नावर भरावा लागतो त्यामुळे समान नागरी कायद्याचा टॅक्स शी काहीही संबंध नाही.
३. धार्मिक पद्धतीने विधी करण्यावर बंदी येईल जसे की लग्न . पण अश्या कुठल्याही प्रकारचे बदल समान नागरी कायदयान्वये होणार नाहीत.
आता जाणून घेऊ समान नागरी कायद्यामुळे होणारे खरे बदल. :-
१. सर्व धर्मासाठी एकच घटस्फोट कायदा राहील.
२. पत्नीचा पतीच्या प्रॉपर्टी मध्ये अधिकार राहील की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणत्याही धार्मिक कायद्याला नसेल तर तो अधिकार समान नागरी कायद्याला असेल.