शेतकऱ्यांना आता फक्त १ रुपया मध्ये मिळणार पीक विमा (1 rupayat Pik Vima Yojana Maharashtra) या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.मित्रांनो तुम्हांला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे.
पीक विमा भरण्याची मुदतवाढ तारीख 3 ऑगस्ट 2023 आहे.
मित्रांनो पीक विमा भरण्यासाठी नुकतेच सरकार ने मुदतवाढ दिली आहे व ही मुदतवाढ 3 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे. तरी ज्यांनी अजूनही पीक विमा भरला नसेल त्यांनी लवकरात लवकर पीक विमा भरून घ्यावा. पीक विमा भरण्यासाठी तुम्ही जवळच्या csc केंद्रमध्ये किंवा सेतु केंद्र मध्ये जाऊ शकता.
pik vima 2023 maharashtra
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या संदर्भ क्र. (१) च्या मार्गदर्शक सूचनांमधील मुद्दा क्रं. १३.१.१० अन्वये जर राज्य शासन शेतकऱ्यांच्या विमा हप्त्याच्या वाट्याची रक्कम भरणार असेल तर, ईलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग व नाव नोंदणी सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांमार्फत विमा हप्त्याच्या ऐवजी किमान १ रुपयाचे टोकन अनिवार्यपणे आकारले जाईल. तद्नुषंगाने, मा. वित्त मंत्री महोदयांचे सन २०२३- २४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये शेतक-यांना केवळ रु. १ भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता “एक रुपयात पीक विमा” या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पिक विमा योजना (1 Rupyat Pik Vima Yojana) राबविण्याकरीता वेळोवेळी निर्गमित होणा-या मार्गदर्शक सुचनांनुसार शेतक-यांना केवळ रु.१/- भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” राबविण्याबाबतच्या प्रस्तावास दि. ३०.०५.२०२३ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.
pik vima 2022 maharashtra list

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी पिकांचे सरासरी नुकसान काढताना किमान 30 टक्के तंत्रज्ञान आधारित उत्पादन व पिक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पादनाचा मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येईल. ही योजना खरीप व रब्बी हंगाम 2023-24 ते 2025-26 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी निविदा प्रक्रीयेने राबविण्यात येईल. विमा हप्ता दरांच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे नफा आणि तोटा शेअरींग मॉडेल किंवा कप अँड कॅप मॉडेल (80:110) नुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेने उचित पर्यायासह राबविण्यात येईल.
योजनेची उद्दीष्टये
- नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतक-याना विमा संरक्षण देणे.
- पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-याचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
- शेतक-यांना नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
- कृषि क्षेत्रासाठीच्या पत पुरवठयात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमीपासून शेतक-यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकाचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल. [PM Pik Vima Yojana in Maharashtra]
बोगस पिक विमा प्रकरणात फौजदारी कारवाई करणे :- ज्या सर्व्हे नंबरसाठी व क्षेत्रासाठी पिक विमा काढण्यात आलेला आहे, त्या क्षेत्राच्या 7/12 उताऱ्यावर शेतकऱ्याचे नाव नसणे, बोगस 7/12 व पिक पेरा नोंदीच्या आधारे पिक विम्याची बोगस प्रकरणे करणे, अशा बाबी निदर्शनास आल्यास अशा प्रकरणात संबंधित दोषीवर कायदेशीर कार्यवाही करण्याची जबाबदारी जिल्हा संनियंत्रण समितीच्या मार्गदर्शना नुसार सबंधित विमा कंपनीची राहील.
तसेच महसुल दस्त ऐवजामध्ये फेरफार करून शासनाचे फसवणूकीच्या प्रयत्नाबाबत महसुल विभागामार्फत तहसिलदार यांनी स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करणेबाबत कार्यवाही करावी.
ई – पीक पाहणी
ई-पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोद करण्यात यावी. विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई-पीक पाहणीमध्ये नोदविलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास ई -पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक अंतीम गृहीत धरण्यात येईल. PM Pik Vima Yojana in Maharashtra
ई-पीक पाहणी करा नाहीतर शेत पडीक समजल जाईल
योजनेच्या अटी
- सदर विमा संरक्षणाची बाब ही विमा अधिसूचित क्षेत्रातील फक्त मुख्य पिकांना लागू राहील. विमा अधिसूचित क्षेत्रावर मुख्य पीक निश्चित करतांना जिल्हा/तालुका स्तरावरील एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी (Gross cropped area) किमान 25% पेरणी क्षेत्र हे हंगामातील त्या मुख्य पिकाखाली असणे आवश्यक राहील. PM Pik Vima Yojana in Maharashtra
- अधिसूचनेपूर्वी बँकेकडून विमा हप्ता जमा न करणे किंवा कपात न करता केवळ पीक कर्जाची मजूरी / वितरण केल्यास संबंधित शेतकरी विमा जोखिमेच्या सरक्षणास पात्र होणार नाही.
- संबंधीत जिल्हाधिकारी यानी योजनेतील सहभागाच्या अंतिम तारखेनंतर 15 दिवसाच्या आत परंतु अधिसूचित पीक वेळापत्रकानुसार पिकाचे पेरणीच्या अंतिम तारखेच्या एक महिन्यापर्यंतच्या मर्यादेत सदर जोखमीबाबत अधिसुचना जाहीर करणे आवश्यक असेल. PM Pik Vima Yojana in Maharashtra
- संबंधित जिल्हाधिकारी यांचे मार्फत बाधित क्षेत्राचा अहवाल, अंदाजित पेरणी क्षेत्राचा अहवाल व अधिसुचना जाहीर झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल.
- शासनाकडून विमा अनुदानाचा प्रथम हप्ता प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनीमार्फत वरीलप्रमाणे नुकसान भरपाई अदा करण्यात येईल. {PM Pik Vima Yojana in Maharashtra}
- सदर जोखमी अंतर्गत बाधित अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकाला नुकसान भरपाई देय झाल्यानंतर सदर पिकासाठी विमा संरक्षण संपुष्टात येईल व सदरचे अधिसुचित क्षेत्र / पीक हे हंगामाच्या शेवटी उत्पन्नाच्या आधारे निश्चित करण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईसाठी पात्र राहणार नाही.
पीक नुकसानीची माहिती कळविण्याची पध्दत
योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत याबाबतची सुचना विमा कपनी, संबधीत बँक , कृषि / महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमाकाद्वारे देण्यात यावी. सर्वप्रथम केंद्रीय टोल फ्री क्रमांकाचा वापर करण्यात यावा.
केंद्रीय टोल फ्री क्रमांक वरून सदर सूचना संबंधित विमा कंपनीस पुढील 48 तासात पाठवण्यात येईल. केंद्रीय टोल फ्री क्रमांक उपलब्ध न झाल्यास सदर आपत्तीची माहिती बँक / कृषि व महसूल विभाग यांना दयावी तसेच सदर माहिती विमा कंपनीस तात्काळ देण्यात यावी, बँकेमार्फत विमा संरक्षित बाबी जसे पीक विमा सरक्षित रक्कम भरलेला विमा हप्ता व त्याचा दिनाक या बाबी तपासून सबंधीत विमा कंपनीस सर्वेक्षणाकरिता कार्यवाही सुरू करण्यासाठी पाठविल्या जातील. (‘PM Pik Vima Yojana in Maharashtra’)
नुकसान भरपाई निश्चित करणेसाठी सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे
- शेतकऱ्याने नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज
- आवश्यक त्या कागदपत्रासह
- (7/12, पिकाची नोंद असलेला विमा हप्ता भरल्याचा पुरावा इ.)
- विमा कंपनीस सादर करणे आवश्यक आहे. “PM Pik Vima Yojana in Maharashtra”
शेतकरी परिपुर्ण माहितीसह विहित नमुन्यातील अर्ज सादर करू न शकल्यास उपलब्ध माहितीच्या आधारे अर्ज सादर करू शकतो, परंतु अर्जातील उर्वरीत माहिती 7 दिवसांच्या आत विमा कंपनीस सादर करणे आवश्यक राहील.
पीक नुकसानीचा पुरावा म्हणून मोबाईल फोनवरील प्रणालीद्वारे घेतलेली छायाचित्रे देता येतील. याबरोबरच भारतीय हवामान विभागाचे अहवाल, प्रसार माध्यमातील बातम्या आदि तपशील सहपत्रित करता येईल.
पीक विमा कोठे भरावा ?
तुमच्या जवळच्या सेतु केंद्राची माहिती इथे पाहा
पीक विमा भरण्यासाठी जवळच्या सेतु केंद्र मध्ये जाऊन पीक विमा नोंदणी करावी .
One Comment