वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय म्हणजेच वारकरी संप्रदाय होय. या संप्रदायाचा महत्वाचा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी. या संप्रदायाचे एक महत्वाचे वैशिष्ट म्हणजे या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक तसेच मराठा , वंजारी, महार ,लिंगायत व इतर जातींचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. व त्यांच्यासाठी वारी हा एक आनंदसोहळा असतो .
सुमारे 5 हजार वर्षपूर्वी रुसून गेलेल्या रुखमिनी ला शोधण्यासाठी द्वारकेमधून दिंडीरवनात आले होते. त्याच वेळी भागवंतांना भक्त पुंडलिकाची आठवण झाली. ते त्याला भेटण्यासाठी त्याच्या आश्रमात आले. घरात भक्त पुंडलीक पाठमोरे बसून आपल्या आईचे चरण धूवत होते. भगवंत तेथे आल्यावर त्यांचे तेज सगळीकडे पसरले. म्हणून पुडलिकांनी मागे वळून पहिले तर साक्षात भगवान श्री कृष्ण त्यांच्या दरात उभे होते. हे पाहून पुडलिकांनी एका हाताने वीट फेकली व म्हणाले आपण या विटेवर उभे रहा. तोपर्यंत आई वडिलांची सेवा झाली की मी येतो असे सांगून आई वडिलांची सेवा करू लागले. पुंडलिकांचा या प्रकारचा आई वाडिलांप्रति सेवाभाव पाहून खूप प्रसन्न झाले व पुंडलिकाला म्हणाले तुला हंव ते वर माग . हे ऐकून पुंडलीक उत्तरले ज्ञान अज्ञान रहित मूर्ख पापी लोकांना देखील भगवंताचे दर्शन व्हावे अशी माझी इच्छा आहे. तेव्हा भगवंत पंढरपूर मध्ये विठ्ठलाच्या रूपात ज्ञान अज्ञान रहित लोकांना दर्शन देण्यासाठी अजून उभे आहेत.
वारीची सुरवात :-
अस बोलल जात कि या वारीची पहिली सुरवात 33 कोटी देवतांनी केली होती. जेव्हा भगवंत विठ्ठलाच्या रूपात पंढरपूर मध्ये आले तेव्हा त्यांचे दर्शन घेण्यासाठी सर्वप्रथम सर्व 33 कोटी देवी देवता त्यांच्या दर्शनासाठी आल्या अस बोलल जात.
पण वारीचा इतिहासातील उल्लेख ही बराच जुना म्हणजे तेराव्या शतकात आढळतो. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घरात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. ज्ञानदेवांनी भागवत धामाची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या समजयला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज , तुकाराम महाराज, माललपप वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली. संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे म्हणतात- पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदयाचा मुख्य आचार धर्म होता.
वारी या विषयावरील पुस्तके:-
- पालखीसोहळा उगम आणी विकास (डॉ. सदानंद मोरे)
- तुकाराम दर्शन (डॉ. सदानंद मोरे)
- आषाढी (डॉ. रामचंद्र देखणे)
- एकदा तरी पायी अनुभवावी पंढरीची वारी (डॉ. सुरेश जोशी)
- पंढरीची वारी (डॉ. वसुधा भिडे)
- श्री पांडुरंग व पंढरी माहात्म्य (ज्ञानेश्वर म. इंगळे)
- ||पंढरी माहात्म्य|| (विठ्ठल दाजी धारूरकर)
- वारकरी पंथाचा इतिहास (शं. वा. दांडेकर)
- वारी एक आनंदयात्रा (संदेश भंडारे)
- वारी एक आनंद सोहळा (दीपक नीलकंठ बिचे)
- वारी : स्वरूप आणि परंपरा (डॉ. रामचंद्र देखणे)
- विठाई (सकाळ प्रकाशन)
- वारीच्या वाटेवर (महाकादंबरी दशरथ यादव)
- पंढरपूरची वारी (दीपक फडणीस)
मित्रांनो अशाच अजून माहिती साठी I Love Pathardi ला टेलेग्राम वर जॉइन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Telegram Link:- https://t.me/ilovepathardii