Naina City:-
मित्रांनो मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी होण्यासोबतच भारत देशाचीही औद्योगिक राजधानी आहे. त्याच महत्वाच कारण म्हणजे येथे असलेल्या आर्थिक आणि सामाजिक संस्थांचे केंद्रस्थान आहे. मुंबई ही देशाच्या 33% इन्कम टॅक्स मिळवून देते व कस्टम ड्यूटी मध्ये मुंबई चा वाटा हा 61% चा आहे. तसेच भारताचा सर्वात जून स्टॉक एक्स्चेंज मुंबई स्टॉक एक्स्चेंज मुंबई मध्येच स्थित आहे. मोठमोठ्या औद्योगिक वसाहती असल्याकारणाने लोक इथे आपल्या चांगल्या भविष्यासाठी येण्यासाठी तडफडत असतात. लोकांच्या मोठ्या प्रमाणावर इथे येण्याने मुंबई वर मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचा तान वाढत आहे. तुम्हाला महितच असेल मुंबई ही भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येच शहर आहे. आणि आता मुंबई मधील पायाभूत सुविधा या कमी पडू लागल्या आहेत व याच कारणामुळे नव्या मुंबई ची निर्मिती करण्यात आली होती आणि आता तीही कमी पडू लागल्यामुळे आता मुंबई ल आणखी एक नवीन शहराची गरज भासू लागली आहे. त्यातच मुंबई शहर हे तीनही बाजूंनी खाडी व समुद्राने वेढलेले आहे त्यामुळे त्याचा विस्तार करणे शक्य नसल्यामुळे आणखीनच गोची वाढली आहे. त्यालाच सोल्यूशन म्हणून नवी मुंबई च्या दूर रायगड जिल्हयामध्ये 371 चौरस किलोमीटर च्या भूभागावर नैना सिटी तयार करण्याची योजना 2013 साली महाराष्ट्र सरकार ने आखली होती. पण 10 वर्षे उलटूनही या शहराच्या बांधणी साठी कोणतीही महत्वाची पाऊले उचलली गेली नाहीत. पण नुकतंच शिंदे सरकार ने या
नैना प्रकल्पात रायगड जिल्ह्यातील १७४ गावे अंतर्भूत आहेत. शासनाने नैना क्षेत्राचा विकास आराखडा २०१९ मध्ये मंजूर केला आहे. या प्रकल्पातील सेवा-सुविधा विकसित करण्यास खासगी भूखंडमालकांचा सहभाग या संकल्पनेवर नैना प्रकल्प आधारभूत आहे. जमीन एकत्रीकरण योजनेद्वारे प्राधिकरणास प्राप्त झालेल्या विकास केद्रांतील जमिनीची विक्री करून मिळालेल्या निधीतून भौतिक सेवा-सुविधांचे जाळे निर्माण करणे तसेच जमीन एकत्रीकरणास प्रोत्साहन देऊन नियोजित विकास साधण्यासाठी सिडकोची भूमिका मध्यस्थ वा समन्वयक म्हणून आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून नगररचना परियोजनांद्वारे शहरांचा विकास साधण्याच्या बाबतीत महाराष्ट्र हे अग्रणी राज्य आहे आणि मुंबई हे त्याचे उत्तम उदाहरण. १९१५ सालच्या ‘बॉम्बे टाऊन प्लॅनिंग ॲक्ट’ अधिनियमामध्ये शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी नगररचना योजना तयार करण्याबाबतची तरतूद करण्यात आली होती. सध्याच्या महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम- १९६६च्या कायद्यामध्ये २०१४ साली सुधारणा करण्यात आल्या.
नैना प्रकल्पाच्या नगररचना परियोजनांचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये असलेला जमीनमालकांचा सहभाग. प्रत्यक्ष जमीन संपादन न करता सहभागी तत्त्वावर भूखंडांचा विकास केला जाणार आहे. योजनेत सहभागी होणारे भूधारक विकासासाठी समान जमिनीचे योगदान देणार आहेत. या योजनेतील जमीनमालकांना मूळ भूखंडाच्या ४० टक्के भूखंड हा विकासयोग्य नियमित आकाराचा अंतिम भूखंड म्हणून परत मिळणार असून अंतिम भूखंडावर २.५ पर्यंतचा चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय राहणार आहे. यामुळे जमीनमालकांना त्यांच्या जमिन क्षेत्राच्या संभावित बांधकाम क्षेत्राचा वापर करता येणे शक्य होणार आहे. उर्वरित ६० टक्के जमीन ही योजनेतील पायाभूत सुविधांसाठी वापरली जाणार आहे. योजनेतील भूखंडांवर पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम सिडकोतर्फे लवकरच सुरू होणार आहे. भूखंडधारकास चटई क्षेत्र निर्देशांकाचा पुरेपूर वापर करता यावा, यासाठी अंतिम भूखंड विकसित विकसित करता यावा म्हणून प्रस्तावित इमारतींच्या समासांच्या (Margin) जागेबाबतचे नियम, अग्निसुरक्षाविषयक तडजोड न करता शिथिल करण्याचे प्रस्तावित आहे.
Naina City Map

Naina City Full Map

Naina City | Naina City Project | naina city in marathi | Details of Naina City |
- वंजारी समाजातील गोत्र व वंशावळी (vanjari matrimony)
- PVC आधार कार्ड ऑनलाईन कसे ऑर्डर करावे ते पण फक्त 50 रुपयात
- 1947 ते 1960 च्या दरम्यान आपला महाराष्ट्र कसा होता. जाणून घ्या
- आपले आधार कार्ड अपडेट आहे कि नाही ते पहा 5 मिनिटात. ते ही मोफत.
- आधारकार्ड वरील पत्ता व C/O care of बदला घरबसल्या फक्त 50 रुपयात.
नेमकी कुठे तयार होणार आहे नैना शहर ? Which Village’s And Taluka’s in Naina City ?
मित्रांनो नैना सिटी ही रायगड जिल्हयामध्ये आहे
List of Places in Naina City :
- Adai (अदाई)
- Akurli (आकुर्ली)
- Belavali (बेलावली)
- Bonshet ( बोनशेत )
- Borle ( बोर्ले )
- Chikhale ( चिखले )
- Chipale ( चिपळे )
- Derawali ( डेरावली )
- Devad ( देवड )
- Kolkhe ( कोळखे )
- Kon ( कोण )
- Koproli ( कोपरोली )
- Moho ( मोहो )
- Vichumbe ( विचूम्बे )
- Palaspe ( पळस्पे )
- Pali Kh ( पाली खुर्द )
- Palidevad ( पालीदेवड )
- Sangade ( सांगाडे )
- Shilotter Raichur ( शिळोत्तर रायचूर )
- Shivkar ( शिवकर )
- Usarli Khurd ( उसरळी खुर्द )
- Part Nere ( पार्ट नेरे )
- Part Vihighar ( पार्ट विहीघर )
काय काय वैशिष्ट्य असतील या नैना सिटी ची ?
राज्य सरकार नुसार आधीच्या दोन्ही म्हणजे बृह मुंबई आणि नवी मुंबई पेक्षा ही मुंबई मोठी असणार आहे. तसेच हे देशातील सर्वात मोठ डेटा सेंटर च माहेर घर असणार आहे. त्यासोबतच भारताच्या Center For Digital Economy And Industry 4.0 च केंद्र असणार आहे. व मोठमोठी इंडस्ट्री हाऊसेसना यामध्ये सामील कार्याची महाराष्ट्र सरकार ची योजना आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये
- जमीन विकासासाठी जमीनमालकांचे समान योगदान
- प्रत्येक योजनेसह विकास आराखड्यातील ४० टक्के आरक्षित जमिनीचा विकास
- कमाल २.५ चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय असलेला एकूण ४० टक्के भूखंड हा अंतिम भूखंड म्हणून जमीनमालकांना देण्यात येईल
- सर्व पायाभूत सुविधा सिडकोतर्फे विकसित करणार
- अंतिम भूखंड हे नियमित आकाराचे व बांधकामयोग्य
- सार्वजनिक वापरासाठी १० टक्के खुली जागा आणि पाच टक्के सोयी सुविधा
- वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकासाठी एकाच जमीनमालकाच्या विखुरलेल्या जमिनींचे एकत्रीकरण करण्याची सुविधा
- ४००० चौ.मी.वरील अंतिम भूखंडासाठी स्वतंत्र अंतर्गत खुली जागा आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या गृहनिर्माणासाठी जागा पुरविण्याची आवश्यकता नाही
चैतन्य कानिफनाथ महाराज मढीला कसे आले ! व मंदिर इतिहास जाणून घ्या.
त्यासोबतच इथे नवीन इंटरनॅशनल एयरपोर्ट तयार होत आहे. सगळ्यात महत्वाच म्हणजे इथली Road Connectivity चांगली असणार आहे. व मेट्रो जाळ ही उत्तम दर्जाच असेल असं राज्य सरकार च म्हणण आहे. मुंबई आणि नवी मुंबई यांना लिंक करणारा 22 किलोमीटर कहा सी लिंक प्रोजेक्ट देखील असणार आहे. तसेच JNPT सोबतच अजून एक PORT खोदल जाणार आहे. ज्याची Cargo Handling Capacity ही JNPT बंदरपेक्षा जास्त असणार आहे. नवीनच तयार झालेल्या नागपूर मुंबई (समृद्धी) महामार्गाची Port Connectivity बंदरासोबतच राज्यातील 20 जिल्ह्यात केली जाणार आहे. हे काम सुद्धा याच प्रोजेक्ट चा भाग असणार आहे. याला जोडूनच तेथे वसई-विरार कोरीडोर असणार आहे, नाव्हा-शेवा सी लिंक सुद्धा असणार आहे. त्यासोबतच मुंबई गोवा महामार्ग सुद्धा आता पूर्णत्वाकडे जात आहे. जेव्हा या सर्व गोष्टी पूर्णत्वाला जातील तेव्हा हे ठिकाण एक मोठ हब म्हणून उदयाला येईल. नैना या सिटी मध्ये 11 प्लॅनिंग स्कीम्स असतील, ज्याद्वारे ही सिटी पूर्णपणे सुनियोजित असेल. या सिटी कहा आधी प्लान हा 1000 वर्ग किलोमीटर इतका होता पण तो आता कमी होत 371 वर्ग किलोमीटर इतकंच झाला आहे. त्याच मोठ कारण म्हणजे स्थानिक लोकांचा विरोध, विरोध करण्याचे कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी यामध्ये जातील त्यांना त्यांचा मोबदला टाइम वर मिळेल की नाही या बद्दल संभ्रम आहे. शेतकऱ्यांच असं म्हणण आहे की नवी मुंबई साठी ज्यांनी जमीन दिली त्यांनाच अजून तत्याचा पूर्ण लाभ मिळाला नाहीय.
नवी मुंबई आणि नैना क्षेत्रातील इमारतीच्या उंचीबाबत दिलासा
सिडको महामंडळाकडून नवी मुंबईमध्ये विकसित करण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर, नवी मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) येथील ज्या बांधकाम प्रकल्पांना भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून उंचीबाबतचे वैध ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे, अशा बांधकामांना परवानगी देण्यात येणार आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रात नमूद केलेल्या उंचीपर्यंतची बांधकामे विकासकांना करता येणार आहेत.
सिडकोकडून नवी मुंबईच्या रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात १,१६० हेक्टरवर आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारण्यात येत आहे. सदर विमानतळामुळे नजीकच्या नवी मुंबई तसेच नैना क्षेत्रातील बांधकामांच्या उंचीवर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. यामुळे अनेक बांधकाम प्रकल्पांना, विशेष नियोजन प्राधिकरण या नात्याने, सिडकोकडून बांधकाम ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले असले, तरी त्यांचा विकास होण्यास वेळ होत होता.
या पार्श्वभूमीवर सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी पुढाकार घेऊन भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि विमानतळ विकसित करणारी सवलतधारक कंपनी नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. यांच्या सहकार्याने या प्रश्नाबाबत मार्ग काढला. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी सिडको, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. यांच्या प्रतिनिधींच्या अनेक बैठका झाल्या. यानंतर ज्या बांधकाम प्रकल्पांना भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून उंचीविषयक ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे व जे वैध आहे, अशा बांधकामांना बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र आणि भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला.