भक्तिBlogमाहिती

म्हसोबा बद्दल थोडीशी माहिती

मुळात म्हसोबा ही देवता एक क्षेत्रपाल देवता आहे. आता क्षेत्रपाल देवता म्हणजे क्षेत्र म्हणजे ठराविक जमीन आणि पाल म्हणजे पालन करणार रक्षण करणारा म्हणजेच ठराविक क्षेत्राचे रक्षण करणारा देव म्हणजे क्षेत्रपाल देवता. क्षेत्रपाल देवतेचे अनेक प्रकार आहेत. त्या मध्ये मुंजा,वीर,म्हसोबा व त्या गावचा स्थानिक मारुती देखील क्षेत्रपाल देवतेत येतो. 

        त्यामध्ये आपण म्हसोबची माहिती पाहणार आहोत. या म्हसोबचे स्थान जास्त करणून आपल्याला शेतामध्ये एखाद्या झाडाखाली , वोढयाच्या कडेला , जुन्या वाड्यात  आशा ठिकाणी म्हसोबा पाहायला मिळतो. थोडक्यात ज्या ठिकाणी गावाची शीव असते त्या ठिकाणी जो म्हसोबा असतो. तो म्हसोबा अत्यंत जागरूक मानला जातो.

        म्हसोबा ही अतिशय सात्विक अशी देवता आहे. त्याच बरोबर ती एक ताम्हसिक देवता देखील आहे. एका बाजूला ती एक शांत देवता तर दुसरीकडे ती उग्र देवता देखील आहे.

        आपण म्हसोबाचे दोन्ही प्रकार पाहू ते खालील प्रमाणे

  • सात्विक म्हसोबा :- या म्हसोबाला  गोडा म्हसोबा देखील म्हणतात. कारण या म्हसोबाला नैवद्यामध्ये गोड पद्धार्थ चालतात त्यामध्ये खीर-पुरी, भाजी-भाकरी ,दही-भात,पुराण-पोळी, नारळ म्हणजे थोडक्यात या म्हसोबा हा शाकाहारी आहे. यालाच देवरूपी म्हसोबा देखील म्हणतात. या देवाची उत्पत्ति ही महेश या देवा पासून झालेली आहे. महादेवाचे नाव आहे. महेश आपण म्हणतो ना ब्रम्हा-विष्णु-महेश त्या पैकी महेश म्हणजे शंकर तर या महेश शब्दाचा अप्रभ्रंश होवून तो महेशबा असा तयार झाला. म्हणजेच त्याचे नाव म्हसोबा असे झाले.

          आज देखील सात्विक म्हसोबा काही गावामध्ये दिसतो.

  • ताम्हसिक म्हसोबा :- या म्हसोबाला खारा म्हसोबा म्हणतात. कारण या म्हसोबाला नैवद्यामध्ये लिंबू, चिलीम, गांजा, कोंबडा, अंड, ईत्यादी प्रकार चालतात त्याला खारा म्हसोबा असे म्हणतात. थोडक्यात हा म्हसोबा मांसाहरी आहे. या म्हसोबाला दैत्यरूपी म्हसोबा देखील म्हणतात. आई जगदंबेने म्हीशासुर  नावाचा दैत्याचा वध केला. हे आपल्याला माहीत आहे. परंतु आई जगदंबेने या म्हीशासुराचा वध करताना त्याला एक वरदान सुद्धा दिल की तू चिरंतर माझ्या पायाशी राहशील आणि तुला मांसाहरचा नैवदय भेटत राहील. आणि तुझी आत्मा माझ्या चरणी अमर राहील. माझ्या दर्शनाच्या आधी तुला मान मिळेल. अस्या प्रकरे या म्हसोबची उत्पती झाली.      

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *