माहितीBlogराजकारण

1947 ते 1960 च्या दरम्यान आपला महाराष्ट्र कसा होता. जाणून घ्या 

15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्या वेळी आपले महाराष्ट्र राज्य नव्हते.

कारण महाराष्ट्र राज्यातील काही जिल्हे हे बॉम्बे राज्यामध्ये होते. तर काही जिल्हे हे तेव्हाच्या  हैद्राबाद राज्या मध्ये होते तर काही आजच्या मध्यप्रदेश मध्ये होते.

स्वतंत्र भारत असा होता 1947 ला

कश्यामुळे महाराष्ट्र राज्य विभागले होते त्याची करणे.

1947 साली भारत स्वतंत्र झाला त्या वेळी देशाचे विविध प्रांत होते. परंतु भाषेच्या आधारावर राज्यांची सीमा निर्धारित करणार होते. परंतु 1947 भारत नुकताच स्वतंत्र झाला होता त्यामुळे त्या वेळच्या सरकारने म्हणजेचे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारने देशात दंगे होतील. म्हणून त्या वेळी भाषेच्या आधारावर राज्यांची सीमा निर्धारित केली नाही.

त्या नंतर पुढे 1956 साली  राज्य पुनर्रचना कायदाआमलात आला. त्या कायद्यानुसार भाषेच्या आधारावर राज्याची निर्मिती सुरू झाली. ह्या कायद्याद्वारे भारताच्या विविध प्रांतांच्या सीमा ह्या भाषेच्या आधारावर निश्चित करण्यात आल्या, आणि तसा बदल भारतीय संविधानात देखील करून घेण्यात आला.

मग याच कायद्यानुसार पुढे 1 नोहेंबर 1956 रोजी मध्य प्रदेश राज्याची पुनर्रचने नुसार स्थापना झाली त्यामध्ये आपले मराठी भाषिक लोक हे त्या वेळसच्या बॉम्बे राज्याला जोडले गेले. त्यामध्ये आजचा विदर्भ हा त्यामध्ये होता. 1956 च्या आधी मध्ये प्रदेश हे राज्य नव्हते. तर central provincesनावाने मध्य प्रांत असे नाव होते. त्याचेच पुढे मध्य प्रदेश असे नाव झाले.

त्याच बरोबर हैद्राबाद हे एक राज्य होते. त्या राज्यामध्ये आपले मराठी भाषिक लोक होते. त्या आपला मराठवाडा होता. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैद्राबाद भारतामध्ये सामील झाले मग पुढे 1956 सालच्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार 1 नोहेंबर 1956 रोजी आंध्र प्रदेश या नव्या राज्याची स्थापना झाली यामध्ये मराठवाडा हा तत्कालीन बॉम्बे राज्याला जोडण्यात आला. तर त्यावेळचे मैसूर राज्य व हैद्राबादचा काही भागाचे मिळून आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली. त्याच बरोबर मैसूर राज्य व हैद्राबादचा काही भाग मिळून कर्नाटक या राज्याची स्थापना झाली.

तर अश्याप्रकारे मराठवाडा व विदर्भ भाषेनुसार बॉम्बे राज्यमध्ये विलणीकरण झाले. परंतु बॉम्बे राज्याला गुजरात देखील जोडलेले होते. भाषेनुसार राज्य पुनर्रचना केली त्यानुसार गुजरातची भाषा ही गुजराती होती तर राहिलेल्या उर्वरीत राज्याची भाषा ही मराठी होती. त्यामुळे पुढे संयुक्त महाराष्ट्र राज्याची मागणी सुरू झाली. 

संयुक्त महाराष्ट्र परिषद

संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला कोणाचा विरोध नव्हता परंतु त्यामध्ये मुंबई हा कळेचा मुद्दा होता. त्या गुजराती लोक हे मुंबई आमची तर महाराष्ट्र मराठी भाषिक लोक म्हणत मुंबई आमची यामुळे खूप वादाचे वातावरण निर्माण झाले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीची सुरवात झाली. त्यामध्ये अनेक क्रांतिकाऱ्यांनी यात आपला जीव गमावला.

नहेरू सरकारने गुजरात हे वेगळे राज्य तर महाराष्ट्र राज्य वेगवेगळे केले. परंतु त्या मुंबई ही केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले. त्यामुळे महाराष्ट्राची जनता पेटून उठली. मग शेवटी 8 मार्च 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र व गुजरात वेगवेगळे करण्याचा निर्णय घेण्यात आले.या निर्णयाने संपूर्ण महाराष्ट्र आनंदित झाला. पुढे काही दिवसांनी म्हणजेच 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र स्थापना झाली.

      अश्या प्रकारे संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.

काही मजेदार प्रश्न

          जर तुम्हाला विचारल की आपल्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण तर. आपण सहाजिकच यशवंतराव चव्हाण असे म्हणू परंतु बॉम्बे राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे बाळासाहेब गंगाधर खेर हे होते. आणि मराठवाडा व विदर्भ यांचे पहिले मुख्यमंत्री हे वेगळे होते.

बॉम्बे राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर हे होते

बॉम्बे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री हे मुरारजी देसाई हे होते.  

तर बॉम्बे राज्याचे तिसरे व शेवटचे मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण हे होते.

त्याचा कार्याकाळ खालील प्रमाणे.

मुख्यमंत्री कार्यकाल
बाळसाहेब खेर 1947 ते 1952
मुरारजी देसाई1952 ते 1956
यशवंतराव चव्हाण 1956 ते 1960

मग पुढे 1 मे 1960 नंतर यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले.

असा होता आपल्या महाराष्ट्रचा थोडक्यात इतिहास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *