भक्ति

मच्छिंद्र नाथ उर्फ बडे बाबा यांचा इतिहास व मायंबा डोंगराशी असणारा लेख नक्की वाचा ! | Machhindranath Maharaj.

मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली हे नक्कीच Comment करून सांगा. आणि आमच्या Whatsapp आणि Telegram Channel ना Subscribe करण्यासाठी त्यावर क्लिक करा. आम्ही अशाच प्रकारची नवनवीन माहिती देत राहू. धन्यवाद !!!!

machhindranath | machhindranath maharaj | machhindra nath maharaj | machhindra nath |

मच्छिंद्र नाथ मंदिर सावरगाव यांच्या बद्दल माहिती जाणून घेऊ महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सावरगाव या गावामध्ये गर्भगिरीच्या डोंगरांमध्ये मच्छिंद्रनाथ महाराजांचे मंदिर आहे. त्याचाच इतिहास आज आपण पाहणार आहोत.

माश्याच्या पोटातून जन्म घेणारे म्हणून मच्छिंद्र नाथ !

श्रीमद भागवतातील उल्लेखाप्रमाणे नवनारायनांनी अवतारी जन्म घेतला. त्यातला कवी नारायणांनी मत्स्य अवतारी जन्म घेतला त्यांनाच आपण मच्छिंद्र नाथ व बडे बाबा म्हणून ओळखतो. त्यांनी शाबरी विद्येची निर्मिती केली हि विद्या इतकी शक्तिशाली आहे कि, या समोर हनुमानांना सुद्धा हर मानवी लागली होती.

चला तर मित्रांनो बघूया गुरु मच्छिंद्र नाथांची संजीवन समाधी व त्यांच्या विषयीची माहिती. गुरु मच्छिंद्र नाथ महाराज कि जय !!!!! अलख निरंजन आदेश !!!!!

Machhindranath maharaj photo | machhindra nath maharaj photo |

मित्रांनो मच्छिंद्र नाथांचा जन्म माशाच्या पोटी झाल्यावर ते बालक कोळ्याला सापडले त्याने त्याचा सांभाळ केला ते मोठे झाल्याबर कोळ्यासोबतच माशे पकडायला जाऊ लागले तेव्हा कोळ्याने पकडलेले मासे मच्छिंद्र नाथ पाण्यात सोडून द्यायचे यामुळे कोळ्याला राग आला व ते मच्छिंद्र नाथांवर ओरडले त्याचा राग मनात धरून मच्छिंद्र नाथांनी घर सोडले व बद्रिका आश्रमात पोहचले व गंगा नदीच्या तीरावर हाडाचा सांगाडा होईपर्यंत 12 तपश्चर्या केली नंतर त्यांच्या वर गुरुदत्त प्रसन्न झाले आणि त्यांना अनुग्रह दिला या मंत्रोपदेशाने मच्छिंद्र नाथांचे अज्ञान लोप पुन पूर्ण ज्ञान प्राप्ती झाली व गुरु दत्तांनी नाथ संप्रदाय निर्माण केला पुढे मच्छिंद्र नाथ तीर्थ क्षेत्रांचे दर्शन करत नाशिक मधल्या वणी येथील सप्तशृंगी गडावर पोहचले व वणी मातेचे दर्शन घेतले या ठिकाणी नाथांनी शाबरी विद्येचे कवित्व करण्याचे ठरवले. यासाठी सर्व देवांना प्रसन्न करण्याची आवश्यकता होती त्या साठी नाथांनी देवी समोर 7 दिवस अनुष्ठान करून मातेला प्रसन्न केल व शाबरी विद्येच्या कवित्वा विषयी सांगितले सप्तशृंगी माता नाथांना घेऊन मार्कंडेय पर्वतावर गेल्या व तेथे नागश्वेताच्या झाडावर भरपूर देव बसलेले दिसले या ठिकाणी माता नाथांना म्हणाली जर या सर्व देवांना शाबरी विद्येसाठी प्रसन्न करायचे असेल तर येथून पुढे ब्रम्हगिरी जवळ एका ठिकाणी 100 कुंडे दिसतील हे ठिकाण नेमके कुठे आहे हे माहित नाही. या ठिकाणी शुक्लवेल घेऊन जा ज्या कुंडात हा वेल टाकल्यावर सजीव दिसेल तेथे स्नान करून सूर्यदेवाचे नाव घे व एकावेळेस एका देवाला तू सिद्ध करू शकतोस असे मातेने सांगितले त्यांनर नाथांनी जवळपास 6 ते 7 महिने एका एका देवाला सिद्ध करून शाबरी मंत्र सिद्ध केले व अखंड भारतात भ्रमण केले व तीर्थ स्थानांचे दर्शन घेत मच्छिंद्र नाथ रामेश्वर या ठिकाणी पोहचले येथील समुद्रात स्नान करू लागले तेव्हा पवनपुत्र हनुमानांनी नाथांना पहिले व परीक्षा घ्यायची ठरवली व मायेने पूस चालू केला व पावसापासून निवाऱ्यासाठी टेकडी उकरायचे नाटक करू लागले.

शाबरी विद्येची रचना करणारे मच्छिंद्र नाथ महाराज !

मछेन्द्रनाथ शाबर मंत्र PDF Download करण्यासाठी येथे क्लिक करा.

तेव्हा नाथ म्हणाले मरकटा तू अगदी मूर्ख दिसतोस तू पाऊस यायच्या आधीच निवारा तयार करायला हवा नंतर त्यांच्यात बरीच बाचाबाची झाली व हनुमान म्हणाले कि, मी मारुतीच्या खूप जवळचा आहे. त्यांनी माझ्यावर प्रसन्न होऊन त्यांची एक प्रतिशत शक्ती दिली आहे. व हनुमानांनी चिडून मच्छिंद्र नाथांवर एकामागून एक पर्वत फेकू लागले. व मच्छिंद्र नाथांनी वातप्रेरक मंत्रांनी ते सर्व पर्वत हवेतच खेळवून ठेवले त्यामुळे हनुमान अजून चिडले व मोठा पर्वत हातामध्ये पकडला हे मच्छिंद्र नाथांनी बघताच समुद्रातून पाणी घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून हनुमानांकडे फेकले. हे फेकताच हनुमानाची शक्ती क्षीण झाली व हनुमान पर्वताखाली जमिनीला चिटकले व त्यांच्यावरचा पर्वत पण बाजूला टाकता येत नव्हता म्हणून शेवटी बेशुद्ध पडले हे बघून वायुदेव लगेच तेथे आले व नाथांकडे हनुमंताला मुक्त करण्याची याचना करू लागले. मग नाथांनी मंत्राने हनुमंतांना पर्वताखालुन मुक्त केले. व हनुमानांना सुद्धा शाबरी विद्येसाठी सिद्ध केले. हनुमानांनी सुद्धा नाथांना विनंती केली कि, तुम्ही श्री राज्यामध्ये येऊन तेथे राणीसोबत राहावे येथे गेल्याने तुमचे ब्रम्हचर्य जाणार नाही असे सांगितले शेवटी, खूप विनंती नंतर मच्छिंद्र नाथ तयार झाले व पुढे जाता जाता देवदेवतांना प्रसन्न केले त्यामध्ये हिंगळा देवी, महाकालिका, वीरभद्र असे अनेक देविदेवता होते.

माहीत आहे का? पवणपुत्र हनुमानांचे लग्न तब्बल 3 वेळा झालेले आहे. तरीही ते ब्रम्हचारी का जाणून घ्या .

चैतन्य कानिफनाथ महाराज मढीला कसे आले ! व मंदिर इतिहास जाणून घ्या.

machhindra nath temple maharashtra | machhindranath temple maharashtra |

या सोबतच वेताळ व त्याच्या भुतावळी सोबत सुद्धा युद्ध झाले व त्यांना देखील शाबरी मंत्रांसाठी सिद्ध केले. जेव्हा वीरभद्राशी मच्छिंद्र नाथांचे युद्ध सुरु होते तेव्हा विरभद्राची शक्ती क्षीण होतांना बघून तेथे ब्रम्हा विष्णू महेश प्रकटले व त्यांचे युद्ध थांबवले तेव्हा मच्छिंद्र नाथांनी ब्रम्हा विष्णू महेश यांना स्वर्ग बघण्याची इच्छा प्रकट केली तेव्हा भगवान विष्णूसोबत ते स्वर्गात गेले व सर्वांकडे जवळपास 7 वर्षे राहिले व त्यानंतर पुढे ते तीर्थ यात्रेस निघाले त्यात त्यांनी प्रभू श्रीरामांना प्रसन्न केले व त्यांचा आशीर्वाद घेऊन शाबरी शाबरी विद्येस सहाय्य करण्याचे वचन घेतले. पुढे मच्छिंद्र नाथ श्रीराज्यात गेले व राणी मैनाकिनी सोबत राहिले त्यांना मीनानाथ नावाचा मुलगा झाला. खूप वर्षे मच्छिंद्र नाथ श्री राज्यातच होते म्हणून त्यांचा शोध घेत त्यांचे शिष्य गोरक्षनाथ त्यांचा शोध घेत स्री राज्यामध्ये आले. या ठिकाणी पुरुषांना प्रवेश नव्हता म्हणून त्यांच्या शिष्याने स्रीरूप धारण केले व स्रीराज्यामध्ये प्रवेश केला. व ढोलकीच्या तालात “ चलो मच्छिंदर गोरख आया” असे म्हणत ढोलकी वाजवू लागले. हा आवाज मच्छिंद्र नाथांनी ओळखला व गोरक्ष नाथांना समोर यायला लावल. व तेथे थोड्या दिवस पाहुणचार घेऊन गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ तेथून निघाले. सोबत मैनाकिनी राणीने मच्छिंद्र नाथांना दिलेली सोन्याची वीट देखील होती. अरण्यातून जाताना मच्छिंद्र नाथांना भीती वाटत होती त्याच कारण गोरक्ष नाथांना कळाल. म्हणून त्यांनी ती सोन्याची वीट फेकून दिली.

मच्छिंद्रनाथ फोटो

मच्छिंद्रनाथ मंत्र

ॐ चैतन्य मच्छिंद्र नाथाय नमः

मच्छिंद्र नाथ महाराजांचे समाधीस्थान

          मित्रांनो तीच वीट फेकून दिलेलं ठिकाण म्हणजे “सोनई” गाव होय. नंतर हि गोष्ट मच्छिंद्र नाथांच्या ध्यानात येताच ते आक्रोश करू लागले. हे बघून गोरक्षनाथ त्यांना म्हणाले आपण संन्यासी आहोत आपल्याला कोणत्याच गोष्टीचा मोह नसावा तरी देखील मच्छिंद्र नाथ ऐकेनासे झाले शेवटी गोरक्षनाथांनी गर्भागीरीचा डोंगरच सोन्याचा करून टाकला. व मच्छिंद्र नाथांचा मोह घालवून परीक्षा पूर्ण केली नंतर मच्छिंद्र नाथांनी गोरक्षाला सांगितले कि मी हि सोन्याची वीट विकून यज्ञ करून अन्नदान करणार होतो. तेव्हा गोरक्षनाथ म्हणाले यासाठी मी मदत करतो. या यज्ञासाठी सर्व देव, देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर अशा अनेकांना निमंत्रण होते. या गर्भगिरीच्या डोंगरांमध्ये यज्ञासाठी प्रसाद बनवण्यात आला, येथे स्वयंपाका साठी तूप कमी पडले. तर मंत्रसिद्धीने मायंबा येथे डोंगराच्या अर्ध्यात म्हणजेच मुख्य मंदिरापासून थोडे खाली गेल्यावर एक मंदिर आहे तेथून तूप बाहेर काढले. त्या ठिकाणी आता धोंडाई देवीच मंदिर आहे. असे सांगतात, कि या ठिकाणाहून जे तूप निघत होत एका बाईने स्वतच्या केसांना लावले तेव्हापासून येथून निघणारे तूप बंद झाले. मित्रानो याठिकाणी यज्ञासाठी ब्रम्हदेव, भगवान विष्णू, महादेवांसोबतच खूप देव देव देवता उपस्थित होत्या. या जेवणाच्या पंगती खूप लांब पर्यंत बसल्या होत्या व महादेवांनी याठिकाणी वृद्ध रुपामध्ये या सर्व पंगतींना जेवण वाढायचे काम केले होते. नंतर नाथांच्या विनंती नुसार वृद्धेश्वर येथे त्यांनी वास्तव्य केले, येथील शिवलिंगाचा आकार दरवर्षी वाढतच जातो. याविषयीची आणखी माहिती पाहण्यासाठी आपण लवकरच श्री वृद्धेश्वरांवर अजून एक लेख लिहू. नंतर नाथांनी भारत भ्रमण करून अनेक गोष्टी केल्या व समाधी घेण्याआधी गिरनार पर्वतावर गुरु दत्तांना भेटले व दत्त गुरूंना सांगितले कि, मी गर्भगिरीच्या डोंगरावर समाधी घेणार आहे. मित्रांनो मच्छिंद्र नाथ म्हणजे दत्त गुरूंचा लाडका शिष्य होय. दत्त गुरूंनी मच्छिंद्र नाथांची गळा भेट घेतली व भाऊक झाले. व दत्त गुरु म्हणाले तू जरी माझ्यापासून दूर असला तरी तुझ जो दर्शन करेल तेच दर्शन माझ्या पर्यंत पोहचेल. गिरनार पर्वता इतकेच महत्व गर्भगिरीच्या पर्वताला देखील असेल आणि तू मला पौर्णिमेला भेटायला येत जा. गुरु दत्तांची शेवटची भेट घेऊन मच्छिंद्र नाथांनी मायंबा येथे येऊन समाधी घेतली.

तुम्हाला माहीत आहे का ? भगवान बाबांवर इंग्रजांचा खबरी असण्याचा आरोप झाला होता. जाणून घ्या !

मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली हे नक्कीच Comment करून सांगा. आणि आमच्या Whatsapp आणि Telegram Channel ना Subscribe करा. आम्ही अशाच प्रकारची नवनवीन माहिती देत राहू. धन्यवाद !!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *