बातम्याराजकारण

गावठाणमधील अतिक्रमण होणार तेथे राहणाऱ्यांच्या मालकीचे. जाणून घ्या काय आहे सरकार चा हा निर्णय ! |gavthan jamin nirnay | 1

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच आपल्या I Love Pathardi च्या वेबसाइट वर, मित्रांनो अशाच प्रकारच्या अजून अपडेट साठी तुम्ही आपल्या टेलेग्राम चॅनलला फॉलो करू शकता.

मित्रांनो नुकतंच एकनाथ शिंदे सरकार ने एक नवीन घोषणा केली आहे ती म्हणजे राज्य सरकार सन 2011 च्या आधीच्या गावठाण जमिनीवरील अतिक्रमण असणाऱ्या अनधिकृत घरांना नियमित करणार आहे.

gavthan jamin

👉राज्य सरकार सर्वसामान्यांचा विचार करून कायमच नवनवीन घोषणांवर भर देत आहे. अशातच राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्य सरकार 2011 आधीच्या गावठाण आणि सरकारी जागेवरील अतिक्रमण असणाऱ्या अनधिकृत घरांना नियमित करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गावठाण आणि सरकारी जागेवरील अतिक्रमण यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

gavthan jaga

🤝 या बैठकीत राज्य सरकारने या विषयावर चर्चा केली. त्यामुळे आता यासंदर्भात लवकरच शासन निर्णय प्रकाशित केला जाणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. गावठाण आणि सरकारी जागेवरील अतिक्रमण असणाऱ्या अनधिकृत घरांना नियमित केल्यास लाखो गोरगरिबांना, झोपडपट्टीधारकांना त्याचा लाभ होणार आहे. येत्या काही दिवसात यासंदर्भात सरकारकडून आदेश काढला जाणार आहे.

gavthan jamin adhikrut

👥 राज्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबतच्या धोरणाला न्यायालयाच्या निर्देशाला अधीन राहून महिन्याभरात अंतिम स्वरूप देण्यात येईल असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकासमंत्री, विभागांचे सचिव उपस्थित होते.

‘सर्वांसाठी घरे २०२२’ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या धोरणात सुधारणा करण्यासाठी ग्रामविकास विभागाने दि. १६ फेब्रुवारी २०१८ चा शासननिर्णय निर्गमित केला आहे. या अनुषंगाने शासनस्तरावरून मार्गदर्शक सूचना / परिपत्रक निर्गमित झालेले आहे.

gavthan jamin nirnay

गावठाण क्षेत्रातील राज्यात ३४ जिल्ह्यांत एकूण २७,८६९ ग्रामपंचायतींपैकी ८६३७ ग्रामपंचायतींमध्ये एकूण २,४१,०७० अतिक्रमण नोंदी झाल्या आहेत. १,३५,८४९ अतिक्रमण नोंदीचे ठराव संगणक प्रणालीवर अपलोड केले आहेत. त्यापैकी १,१५,६९० ठराव ग्रामपंचायतीने मंजूर केले आहेत. मंजूर केलेल्या अतिक्रमण नोंदी गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविल्या आहेत.

नक्की पाहा ! तुमच्या आधार कार्ड ला कोणता नंबर लिंक आहे हे पाहण्याची ही 1 Trick.

गावठाण क्षेत्राबाहेरील राज्यात ३४ जिल्ह्यांत एकूण २७८६९ ग्रामपंचायतींपैकी ६७३७ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ३,३६,४६३ अतिक्रमण नोंदी झाल्या आहेत. १,७२,०७० अतिक्रमण नोंदीचे ठराव संगणक प्रणालीवर अपलोड केले आहेत. त्यापेकी १,२५,८५३ ठराव ग्रामपंचायतीने मंजूर केले आहेत. मंजूर केलेल्या अतिक्रमण नोंदी गट विकास अधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे मंजुरीसाठी पाठविल्या आहेत. उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचेकडे प्राप्त ३५,५४४ अतिक्रमण नोंदीपैकी ११८ नोंदी मंजुर केल्या आहेत. २९८७ अतिक्रमण नोंदी रद्द करण्यात आल्या आहेत. ३१,४३९ नोंदी प्रलंबित आहेत.नक्की पाहा ! तुमच्या आधार कार्ड ला कोणता नंबर लिंक आहे हे पाहण्याची ही 1 Trick.

अशी आहे राज्यातील गावठाण अतिक्रमणांची स्थिती
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांचेकडे प्राप्त ४४,८९६ अतिक्रमण नोंदीपैकी ४०,५६७ नोंदी मंजूर केल्या आहेत. २०१५ अतिक्रमण नोंदी रद्द करण्यात आल्या आहेत. २३१४ नोंदी प्रलंबित आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंजूर केलेल्या एकुण ४०,५६७ नोंदीपैकी २५,२४४ सशुल्क तर १५,३२३ विनाशुल्क नोंदी आहेत. विनाशुल्क नोंदीपैकी ६०८८ अतिक्रमणधारकांना जागा नावावर करुन प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. सशुल्क नोंदीपैकी ५ अतिक्रमणधारकांनी आजपावेतो शुल्क भरलेले आहे.

एकूण २९,५१९ एवढ्या अतिक्रमणांची नोंद
शासनस्तरावरून गावठाण क्षेत्राबाहेरील विविध प्रकारच्या जमिनीवर केलेल्या अतिक्रमण नोंदी १,७२,०७० पैकी गायरान क्षेत्रावर १,०५,८८० व वनविभागाच्या जमिनीवर २३,५९५ आणि सार्वजनिक वापराच्या जमिनीवर १३,०७६ अशा एकूण १,४२,५५१ एवढी अतिक्रमणे आहेत. उर्वरित ३७ प्रकारच्या जमिनीवर एकूण २९,५१९ एवढ्या अतिक्रमणांची नोंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *