आज आपण E-Peek Pahani Maharashtra ई- पीक पाहणी कशी करायची किती तारखेपर्यंत असणार मुदत तर आपण आज हेच जाणून घेणार आहोत सविस्तर पाहूया मग,अशाच नवनवीन अपडेट साठी तुम्ही आमच्या टेलेग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकतात.
या तारखेची आत ई-पीक पाहणी करा:
E-Peek Pahani Maharashtra
राज्यातील सगळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ही पीक पाहणी करणे गरजेचे आहे जे शेतकरी पीक पाणी करणार नाही त्या शेतकऱ्यांचे क्षेत्र पडीक म्हणून दर्शविले जाईल आपली E-Peek Pahani करून घ्यावी असा निर्णय शासनाच्या वतीने आलेला आहे ई पीक पाहणी प्रकल्पासाठी सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केलेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली ही पीक पाहणी 30 जुलै पर्यंत करुन घ्यावी. ई पीक पाहणी करताना काही समस्या आढळल्यास शेतकऱ्यांनी तलाठ्याशी संपर्क साधावा तलाठ्या कडून शेतकऱ्यांच्या समस्येचे निवारण केली जाईल.
E-Peek Pahani Maharashtra:
ई- पीक पाहणी करणे हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याच शेतकऱ्यांचा पारंपारिक व्यवसाय म्हणजे शेतीच आहे. त्यांचे जीवन शेतीवरच आधारित आहे दारिद्रय रेषेखालील शेतकरी किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे तसेच अनेक शेतकरी शेतीला खर्च करण्यासाठी बँक,वित्त संस्था किंवा सावकाराकडून व्याजाने पैसे घेतात आणि शेतीला खर्च करतात परंतु निसर्ग साथ देत नाही, दुष्काळ,मुसळधार पाऊस, गारपीट,अवकाळी पाऊस या गोष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास पिकवलेली पिकांचे जास्त प्रमाणात नुकसान होते आणि शेतकरी घेतलेले कर्ज फेडू शकत नाही आणि या सगळ्या समस्या लक्षात घेऊनच महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई देणे यासाठीच सरकारने ई पीक पाहणी हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबवला आहे.
E-Peek Pahani Maharashtra समाविष्ट अवस्था
- पेरणी केल्यानंतर दोन आठवडे पूर्ण झालेले पीक
- पिकांची पूर्णपणे झालेली वाढ
- पिकांची कापणी करण्या अगोदरची अवस्था.
E-Peek Pahani Login
ई-पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वर जाऊन(E-Peek) Version2 असे सर्च करा आणि Install येथे क्लिक करा. तिथे तुम्ही लगीन करून ई – पीक पाहणी करू शकता.
प्ले स्टोअर लिंक :- https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova
E-Peek Pahani (प्रकल्प)
- प्रकल्पाचे नाव- ई पीक पाहणी
- राज्य कोणते- महाराष्ट्र
- विभाग- कृषी विभाग
- कोणा कोणाला लाभ मिळेल-राज्यातील संपूर्ण शेतकरी काय.
- प्रकल्पाचा उद्देश- पिकाची नुकसान झाल्यास त्वरित लाभ देणे.
- नोंदणी- ॲपच्या सहाय्याने