Blogभक्ति

चैतन्य कानिफनाथ महाराज मढीला कसे आले ! व मंदिर इतिहास जाणून घ्या. | कानिफनाथ मढी | 1

Kanifnath Mandir Madhi | Madhi Kanifnath | madhi kanifnath mandir | chaitanya kanifnath maharaj |

कानिफनाथ मढी किती किलोमीटर आहे | पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मढी येथील कानिफनाथ जन्म देखावा

मित्रांनो भगवान श्री कृष्णाच्या आदेशाने नऊ नारायनांनी वेगवेगळ्या नाथांच्या रूपाने अवतार घेतले. सर्वप्रथम मच्छिंद्रनाथ हे नाथ संप्रदायचे आद्य प्रवर्तक मानले जातात. या मध्ये मित्रांनो सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये गहिनिनाथांनी पाऊल टाकलेले आहे हे माहीत असुदया . त्यातील प्रबुद्ध नारायनांनी (कानिफनाथांनी) हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला.

कानिफनाथ मंदिर मढी

म्हणून त्यांना कानिफनाथ असे म्हणतात. आजच्या या ब्लॉग मध्ये मित्रांनो आपण चैतन्य कानिफनाथ महाराज यांच्या बद्दल बरंच काही जाणून घेऊ.

कानिफनाथ महाराजांचा नाशिक वरून मढी कडे येण्याचा प्रवास | Chaitanya kanifnath maharaj history |

चैतन्य कानिफनाथ महाराज हे नाशिक वरुन मढीला आले. त्यांच्या प्रवासामध्ये ते मिरी आणि तांबोलदेव या दोन ठिकाणी थांबले होते. तेथूनच पुढे त्यांनी मढीला येण्याचा प्रवास केला. नवनाथाप्रमाणेच कानिफनाथ महाराजांचा देखील मोठा शिष्य परिवार होता. ते त्यांच्या समवेतच हा प्रवास करत होते. अशा त्यांच्या प्रवासाबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेऊ.

कानिफनाथांचे मिरी येथील वास्तव्य | kanifnath maharaj |

चला तर मित्रांनो आता आपण चैतन्य कानिफनाथ महाराज यांच्या मिरी येथील वास्तव्याबद्दल.

मिरी येथील कानिफनाथ मंदिर

येथील गावकऱ्यांच्या माहितीनुसार कानिफनाथ महाराजांचा येथे वास्तव्य हे बारा वर्ष वास्तव्य होत. मित्रांनो हे मंदिर हे मधील येथील चैतन्य कानिफनाथ मंदिरासारखेच आहे. येथे एक बारव आहे.

मिरी येथील बारव

ही बारव म्हणजे कानिफनाथांची अंघोळीची जागा होती अस येथील लोक सांगतात. हे मंदिर हे मढीच्या मंदिराचीच प्रतिकृति करण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे. असं येथील ग्रामस्थ सांगतात. मित्रांनो जेव्हा कानिफनाथ महाराज नाशिकवरुण मद्धीकडे येत होते. तेव्हा अहमदनगर मधील कापुरवाडी येथे 5 दिवस त्यांनी मुक्काम केला होता. त्यानंतर कानिफनाथ महाराज मिरी येथे आले. मग मिरी मध्ये त्यांनी जवळ जवळ 12 वर्षे वास्तव्य केले.

कानिफनाथ हे तांबडादेव(जवखेडे) परिसरात

येथून पुढे कानिफनाथ महाराज तांबडादेव(तांबूळदेव) या परिसरात आले. तेथे नाथांनी विश्रांती घेतली. अस बोलल जात की या ठिकाणी नाथांनी पान खाऊन थुंकल होत. म्हणून तेथे तांबड झाल. म्हणून तेथे मंदिराला तांबडादेव मंदिर अस बोलल जात. पुढे हे मंदिर मुस्लिम समाजाच्या ताब्यात गेल त्यांनी या मंदिराच नाव तांबूळदेव करून टाकल असं बोलल जात.

तांबडा देव मंदिर जवखेडे

येथे नाथांच्या घोड्याच्या टापा देखील आहेत. मित्रांनो हे तांबडा देव मंदिर हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात जवखेडे या गावामध्ये आहे. कानिफनाथ महाराज येथूनच पुढे मढीला गेले.

मित्रांनो नवनाथ ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की, चैतन्य कानिफनाथ महाराजांना मुघल आक्रमणाबद्दल माहिती होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या समाधीची रचना मुघलांच्या पद्धतीप्रमाणे ठेवली होती असं म्हणतात. त्यामुळे त्यांच्या समाधीला त्या काळी हानी पोहचली नाही. पुढे नाथांच्या मंदिरावर मुस्लिम समाजाच्या लोकांनी अतिक्रमण करून त्यांची रचना बदलली व दरग्यासारखी केली. कारण पूर्वी या मंदिराची ओळख तांबडादेव म्हणूनच होती. नंतर या लोकांनी तांबडादेव च तांबोळदेव केल. आता तर या मंदिराच नाव हजरत बाबा रमजान शाह दर्गा असं केल आहे. या मंदिराला नाथांचा इतिहास आहे. व या मंदिरपरिसरामध्ये हिंदू मंदिरांचे स्तंभावशेष दिसतात. एव्हडच नाही तर या मंदिराच्या वरच्या बाजूची नकाशी ही मढी मधील कानिफनाथ महाराजांच्या मंदिराच्या नकाशी सारखे सेम आहे. तसेच या मंदिर परिसरामध्ये कब्रस्तान करून ठेवले आहे. या मंदिरामध्ये मुस्लिम पुजारी आहेत. हे मंदिर हिंदू लोकांच्या ताब्यामध्ये यावे म्हणून येथील गावकरी प्रयत्न करतायत.

मढी येथील प्राचीन लेख | kanifnath story | kanifnath temple |

मित्रांनो आता आपण जाणून घेऊ मढीमधील इतिहास, तांबडादेव नंतर कानिफनाथ महाराज हे मढी मध्ये आले. व यांनी तेथेच साधनेस सुरवात केली. मढी मधील मंदिर हे खूप जूने आहे. मढी हे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आहे. मित्रांनो मढीला भटक्यांची पंढरी असं पण बोलल जात. त्याच कारण अस आहे मित्रांनो मढी मध्ये सर्वांनाच समान मान सन्मान दिला जातो. मित्रांनो समाधी मंदिराच्या उत्तरेकडे ज्या पायऱ्या आहेत त्यांचा तळाला एका दगडावर एक प्राचीन लेख लिहिलेला आढळतो.

मढी मंदिराच्या तळाला असलेला लेख

त्यावर काय लिहिलेल आहे हे कळून येत नाही, तसंच अजून एक लेख देखील मंदिरावर आहे. पण त्याची भाषा ही या पेक्षा वेगळी आहे.

जेव्हा कानिफनाथ महाराज मढी मध्ये आले तेव्हा ते पवनागिरी नदीच्या काठी आपेश्वर या महादेवाच्या मंदिरामध्ये समाधी लाऊन बसायचे.

आपेश्वर मंदिर मढी

तेथील काही जाणकार सांगतात की गुरु मच्छिंद्रनाथ देखील त्यांच्या समवेत समाधी लाऊन बसायचे, कानिफनाथांचे जे शिष्य होते ते काही उत्सव असल्यास ढोल, ताशा, डफ यांसारखी वाद्ये वाजवत असत, त्यामुळे त्या वाद्यांच्या आवाजाने मच्छिंद्रनाथांच्या ध्यानसाधनेमध्ये व्यत्यय यायचा तेव्हा ते कानिफनाथांना बोलले की, मी वरच्या डोंगरावर जातो व तेथे ध्यानसाधणा करतो असे बोलले. या माहितीचा पुरावा कुठे मिळत नाही परंतु असा बोलल जात.

नंतर च्या काळामध्ये कानिफनाथ महाराज हे मंदिरामधील गुफेमध्ये ध्यानसाधणा करू लागले. चैतन्य कानिफनाथ महाराजांनी फाल्गुन वैद्य पंचमीला म्हणजेच रंगपंचमीला सजीवन समाधी घेतली, म्हणूनच रंगपंचमीच्या दिवशी मोठी यात्रा भरते. दिवसभर येथे महाराष्ट्रासोबतच देशभरातून लाखों भाविक येथे येतात. या दिवशी सर्वांना मंदिराच्या यातून दर्शन घेता येते. इतर दिवशी मात्र बाहेरूनच दर्शन घ्यावे लागते. पाडव्याच्या दिवशी दक्षिण गंगा म्हणजेच गोदावरी नदीवरुन पाणी कावडीने पायी चालत आणले जाते. व ते पाडव्याच्या पहाटे समाधीवर वाहिले जाते. म्हणजेच महाराजांना आंघोळ घातली जाते. या वेळेस चंदनाचा लेप समाधीला लावला जातो, त्या सोबतच सुगंधित द्रव्ये, अत्तर,फुले व वस्र अर्पण करून महा आरती केली जाते. हा सर्व सोहळा म्हणजेच पंढरपूरची आषाढी एकादशी सारखा देदीप्यमान असतो. रंगपंचमी पासून ते पाडव्यापर्यन्त अनेक भक्त येथे झेंड्याची काठी ( मानाची काठी ) घेऊन येतात.

मानाची काठी

ही काठी मंदिराच्या कळसाला टेकवली जाते. पूर्वी या काठ्या आतमधील समाधीला टेकवल्या जायच्या पण आता त्या मंदिरालाच टेकवल्या जातात. या दिवशी कळसावर रेवड्याचा प्रसाद देखील उधळला जातो.

मित्रांनो समाधी मंदिराच्या दक्षिणेला दूरच्या डोंगरावर मच्छिंद्र नाथांचे सजीवन समाधी मंदिर दिसते. तसेच मंदिराच्या पश्चिमेला कानिफनाथ महाराजांचे ध्यान मंदिर आहे.

ध्यान मंदिर मढी

हे मंदिर खूपच राहस्यमई आहे. या मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर सर्वप्रथम इथे नंदीची मूर्ती आहे त्या पाठोपाठ विठ्ठल आणि रखुमाई ची मूर्ती आहे. मंदिरातील एक कोपऱ्यातून एक भुयार आहे. तेथून खाली जाणे खूपच कठीण आहे. त्यातून खाली गेल्यावर तेथे एक भगवान शंकराची पिंड आहे.

भुयार
मढी येथील ध्यानमंदिर आतमधून

इथेच कानिफनाथ महाराज ध्यानस्त बसायचे, तिथे पूर्णपणे अंधार आहे, त्यात पश्चिमेकडे एक छोटीसी खिडकी आहे. जिच्यातून रोज सायंकाळी सूर्यप्रकाश त्या पिंडीवर पडतो. येथील स्थानिक लोक असे सांगतात की, हे भुयार हे मच्छिंद्रनाथांना भेटण्यासाठी कानिफनाथ महाराज वापरत परंतु आजच्या काळी ते बंद आहे.

कानिफनाथांची भक्त डाळिंबाई | कानिफनाथ आरती pdf | कानिफनाथ मढी किती किलोमीटर आहे |

समाधी मंदिराच्या उत्तरेला एक डाळींबाचे झाड व त्याखाली एक देवीची मूर्ती आहे.

डाळिंबाई

डाळिंबाई नावाची एक महिला नाथ संप्रदायाची दीक्षा घेण्यासाठी तिने कानिफनाथांची कठोर तपस्या केली, व शेवटी कानिफनाथ महाराजांनी रंगपंचमीच्या दिवशी स्वतः प्रकट होऊन तिला दर्शन दिले, व म्हणाले की तुझ्याकडे जो मनोभावी इच्छा मागून धागा बांधेल त्याची इच्छा पूर्ण होईल. काही कालावधी नंतर या समाधीच्या तिथे एक डाळींबाचे झाड उगवले व त्या झाडाला लोक धागा बांधू लागले व त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ लागल्या.

मढीचे कानिफनाथ मंदिर आणि राणी येसुबाई यांचा संबंध | मढी कानिफनाथ मंदिर |

मित्रांनो जेव्हा शाहू महाराज पहिले मुघलांच्या वेढ्यामध्ये अडकले होते तेव्हा राणी येसुबाईंनी कानिफनाथांना नवस केला होता की , जर माझा शाहू महाराजांची सुटका पाच दिवसाच्या आत मध्ये केली तर कानिफनाथ गडाचा सभामंडप व नगारखाना हे बांधून देईल व तसेच देवाला पितळी घोडा अर्पण करेल. असा नवस केला होता. व त्यानंतर शाहू महाराजांची सुटका ही पाच दिवसाच्या आत झाली. त्यानंतर राणी येसुबाईंनी चिमाजी सावंत यांना मढीला पाठवून प्रचंड असे प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडप इत्यादि बांधायला लावले. तसेच पिलाजी गायकवाड यांना देखील यांना पितळी घोडा अर्पण करण्यास सांगितले. त्या सोबतच राणी येसुबाईंनी वैदिक पूजा व्हावी म्हणून वैदिक ब्राम्हण नियुक्त केले. या वेळी केलेल्या बांधकामासाठी गडाच्या पायथ्याशी एक मोठी बारव बांधली जी आजही इथे आहे.

गौतमी बारव मढी

तिला गौतमी बारव असे म्हणतात. त्यातील पाण्याचा उपयोग गडावरील बांधकामासाठी केला होता. ही बारव ही अहिल्याबाई होळकर यांनी बांधली असल्याच ही काही गावकरी सांगतात.

मित्रांनो याबद्दल अजून माहिती आपण नक्कीच आणू.

भगवान गडा बद्दल इतिहास माहीत आहे का ? आणि भगवान गडाचा जुना फोटो पहिला का ?

माहीत आहे का? पवणपुत्र हनुमानांचे लग्न तब्बल 3 वेळा झालेले आहे. तरीही ते ब्रम्हचारी का जाणून घ्या .|

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *