Blogमाहितीराजकारण

आजचा केंद्रीय मंत्री ज्याने एके काळी कित्येक दहशतवादी हल्यापासून देशाला वाचवल असं व्यक्तिमत्व म्हणजे अजित डोवाल नक्की जाणून घ्या त्यांच्या बद्दल 5! | ajit doval | ajit doval news |

अशाच नवनवीन अपडेट साठी तुम्ही आमच्या टेलेग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता.

मित्रांनो आज एका अशा व्यक्ती बद्दल जाणून घेणार आहात ज्याने देशासाठी कित्येक वेळा स्वतःचा जीव धोक्यात घालून अशी कित्येक कामे केली त्यामुळं आज तुम्ही आम्ही सुरक्षित आहोत. ते म्हणजे आपल्या देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ज्यांना केंद्रीय मंत्र्याचा दर्जा दिला आहे असे माजी IPS अधिकारी अजित डोवाल होय. ज्यांच नाव कित्येक वर्षे देशाला माहीत नव्हत कारण ते IB मध्ये होते तेव्हा ते अशा अनेक ऑपरेशन मध्ये सहभागी होते ज्यामुळे त्यांच्या जीवाला पण धोका झाला असता.

ajit doval

अजित डोवाल माहिती | बायोग्राफी मराठी | ajit doval biography | ajit doval history in marathi | ajit doval book in marathi |

अजित डोवाल शिक्षण:-

वाचकहो, अजित डोवाल यांच्या बद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. ते आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा उजवा हात आहेत असंही काही लोक म्हणतात. अजित डोवाल त्यांच्या 37 वर्षाच्या सेवे मध्ये जवळ जवळ 20 वर्ष गायब राहिले. त्यांचा जन्म उत्तराखंड मध्ये पौरी गढवाल या जिल्ह्यामध्ये घिरी बनेरसिओ येथे 20 जानेवारी 1945 मध्ये झाला. त्यांचे वडील मेजर जी. एन. डोवाल हे भारतीय सेना मध्ये अधिकारी होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजस्थान मधील अजमेर मिलिटरी स्कूल मध्ये झाले. त्यानंतर ते economics मध्ये MA करण्यासाठी ते आग्रा यूनिवर्सिटी दिल्ली मध्ये आले. सन 1966 मध्ये ते आग्रा यूनिवर्सिटी मधून MA पास होतात, त्यानंतर ते UPSC देण्यासाठी अभ्यास करायला सुरवात केली त्यांच लहानपणापासून हे स्वप्न होत की जासुस व्हायच व देशासाठी काम करायच. अजित डोवाल पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये सिलेक्ट होतात. व IPS(भारतीय पोलिस सेवा) मध्ये दाखल झाले.

अजित डोवालांची पहिली पोस्टिंग:- | ajit doval first posting |

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना केरळ हे केडर राज्य मिळते व ते केरळ ASP म्हणून रुजू होतात. त्यानंतर काही दिवसांनी केरळ मध्ये कुननूर जिल्हयामध्ये थलासेरी येथे दंगली सुरू होतात. व परिस्थिति हाताबाहेर जाते कारण ही दंगल हिंदू आणि मुस्लिम यांच्या मध्ये असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लुटपाट होते, घर जाळली जातात. त्या जिल्हयामध्ये जे पोलिस आधिकारी होते ते त्या परिस्थितीला कंट्रोल मध्ये आणू शकले नाही. त्यावेळी करुणाकरण हे राज्याचे गृहमंत्री होते. त्यांनी नुकत्याच नवीन आलेल्या तरुण अशा अजित डोवालांना कुननूर मध्ये पाठवण्याच डिसीजन घेतले व त्यांना त्या दंगलीच्या ठिकाणी रुजू केले. रुजू झाल्यानंतर ते दंगल झालेल्या भागामध्ये बिनधास्त फिरतात व लोकांना विश्वासात घेऊन शांत करतात व माहिती काढून दंगल करणाऱ्या लोकांना शोधतात व चांगल्या प्रकारचा चोप देऊन माहिती काढतात की लुटपुट केलेल्या माल कुठ आहे व तो माल शोधून लोकांना परत केला . हे सर्व करण्यासाठी फक्त दोन दिवस लागतात व लोकांना शांत करतात त्यामुळे त्यांची खूप वाहवाहि होते व लोक त्यांना खूप चांगला अधिकारी समजून त्यांची वाहवाही करतात. त्यांच्या या कामाची दखल केरळ पासून दिल्ली पर्यंत घेतली गेली. व सन 1972 मध्ये त्यांना दिल्ली ला बोलवल जात व त्यांच्या कामाची पद्धत पाहून त्यांना इंटेलिजन्स ब्युरो मध्ये पाठवल जात व तेथूनच त्यांची जासुस बनण्याची सुरवात होते. त्यांना पण जासुस व्हायच हेच वाटायच आणि त्यांना तेच भेटत गेल.

अजित डोवालांची मिजोरम मधील कामगिरी | AJIT DOVAL IN MIZORAM |

त्यानंतर मिजोरम मध्ये अचानक मिजो नॅशनल फ्रंट या विद्रोही संघटनेने विद्रोह वाढवून दूसरा देश निर्माण करण्याची मागणी केली. या मिजो नॅशनल फ्रंट चा प्रमुख लाल डेंगा याने मोठ्या प्रमाणावर भारतीय सेनेवर हल्ले केले. एका IPS अधिकाऱ्याची हत्या केली. त्यामुळे परिस्थिति खूपच खराब झाली. मिजोरम हे डोंगराळ राज्य असल्यामुळे तेथे नियंत्रण ठेवणे प्रशासनाला कठीण होत चालले होते. आणि परिस्थिति अशी झाली होती की मिजोरम भारताच्या हातातून लवकरच जाईल अस सर्वांना वाटतच होत. त्यानंतर आयबी मधील कोणी तरी जाऊन त्या ठिकाणची खबर काढून त्या ठिकाणची परिस्थिति कशी कंट्रोल करण्याच काम कोण करील असं प्रश्नचिन्ह होत. कारण तिथल्या परिस्थितीला पाहून कुणी जायला तयार नव्हते तर कोणाला पाठवावे असा प्रश्न उभा राहिला. या गोष्टीच्या जवळ जवळ एक वर्ष आधी अजित डोवाल यांच नवीनच लग्न झालेल होत . जेव्हा त्यांना माहीत होत की मिजोरम मध्ये अशी परिस्थिति आहे तर ते स्वतः पुढे येऊन म्हणतात की, मी मिजोरम मध्ये आयबी चा एजंट बनून जातो. त्यावेळी त्यांना त्यांचे सहकारी म्हणाले की तुमच आत्ताच लग्न झालाय कशाला जाण्याची रिस्क घेता. तरीही ते म्हणाले की नाही मला जायचयच. व त्यानंतर अजित डोवालांना मिजोरम मध्ये पाठवल जात. आता इथून पुढची 5 वर्षे त्यांना मिजोरम मध्येच राहायच होत. तिथे जाऊन ते तेथे एक एक माहिती गोळा करतात व त्यात त्यांना माहीत पडत की मिजो नॅशनल फ्रंट चा प्रमुख लाल डेंगा हा त्याच्या 7 कमांडर च्या जोरावर ताकदवर आहे व त्यांच्या सहाय्याने सर्व ठिकाणी दहशत पसरवतोय. हळू हळू त्यांनी या 7 लोकांबद्दल माहिती गोळा केली त्यामध्ये त्यांचे हत्यार त्यांची ताकद त्याचबरोबर त्यांची काय कमजोरी आहे. कित्येक वेळी पकडल जाण्याची परिस्थिति निर्माण झाली पण त्यांनी माघार नाही घेतली व काम करत राहिले त्यांतर ते या सर्व सात लोकांपर्यंत पोहचले व त्यांना हे समजावण्यात यशस्वी झाले की, कशाप्रकारे भारतामध्ये राहिल्याने तुमचा फायदा आहे. कारण मिजोरम ही एक लँडलॉक भूभाग आहे तर त्यांना स्वतंत्र झाल्यानंतर ही भारताची गरज पडलीच असती तसेच भारतात राहिल्यास तुम्हाला सर्व गोष्टीची मदत/सहाय्य होईल याची ग्वाही दिली. आणि जर दूसरा देश बनवला तर त्याच काय नुकसान होईल हे पण त्यांना समजावून सांगितल. तर त्यामधील 7 पैकी 6 कमांडर हे भारत सरकारच्या बाजूने वळवले व सन 1976 मध्ये भारत सरकार व MNF(मिजो नॅशनल फ्रंट) यांच्या मध्ये शांती समझोता वर बातचीत सुरू झाली. व या मध्ये त्यांनी लाल डेंगा याला भारताशी शांती समझोता करण्यास मजबूर केल. व मिजोरम भारताचा हिस्सा झाला व निवडणूक होऊन लाल डेंगा मिजोरम चे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आज ईशान्य भारतातील सर्वात प्रगतिशील राज्य म्हणून मिजोरम ची ओळख आहे. आणि हे सर्व अजित डोवाल यांच्या चाणक्य नीती मुळे शक्य झाल. एका इंटरव्ह्यु मध्ये मिजोरम चे मुख्यमंत्री व एके काळचे विद्रोही यांनी एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते की अजित डोवाल नसते तर मिजोरम ची पीस अकॉर्ड साइन नसत झाल. मिजोरम च्या मसल्यामध्ये त्यांनी जे काम केल त्यासाठी त्यांना राष्ट्रपति पदक मिळाल जे की फक्त नोकरीच्या 8 वर्ष सेवेमध्ये राष्ट्रपति पदक मिळवणारे हे पहिले पोलिस अधिकारी होते. साधारणतः हे मेडल कमीत कमीत 15 ते 16 वर्ष सेवा असताना मिळते.

अजित डोवाल सिक्कीम मध्ये | ajit doval | ajit doval news |

मिजोरम ची शांतता झाल्यानंतर पण अजित डोवाल यांना सिक्कीम मध्ये पाठवल . ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला तेव्हा सरदार पटेल हे त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना म्हणाले होते की, सिक्कीम चा पण भारतामध्ये विलय करावा कारण चीन कडून सिक्कीम वर आक्रमण होऊन सिक्कीम व चीन कब्जा करू शकत. पण त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी चीनला वाईट वाटेल व वेगळा मेसेज जाईल व चीन नाराज होईल म्हणून सिक्कीम ल भारतामध्ये सामील करण्यास नकार दिला. व सन 1950 मध्ये भारत सरकार ने सिक्कीम सरकार शी एक करार होतो व त्यामध्ये भारत सरकारने सिक्कीम च्या सुरक्षेची जिम्मेदारी घेतली. त्याच सोबत भारत सरकार सिक्कीम चे आंतराष्ट्रीय संबंध सांभाळणार असे ठरले.

त्यांनंतर सुमारे 14 वर्षानंतर 1964 मध्ये सिक्कीम चे त्या वेळचे राजे पलडेंग नामग्याल यांनी भारत सरकारशी हा करार तोडण्यासाठी बातचीत चालू केली. त्यांच म्हणण होत की सिक्कीम या कारारामध्ये राहण्याच्या मनस्थितीत नाही. व भारत सरकार ला म्हणाले की तुम्ही सिक्कीम ला एका स्वतंत्र देशाचा दर्जा द्या. बराच काळ या विषयावर सिक्कीम सरकार व भारत सरकार यांच्या मध्ये बातचीत चालू राहते. त्या नंतर च्या काळामध्ये चीन चा हस्तक्षेप सिक्कीम मध्ये वाढू लागला. म्हणून त्यावेळचे RAW चे प्रमुख आर. एन. काओ यांना इंदिरा गांधी यांनी विचारले की आपण सिक्कीम च्या विषयावर काय करू शकतोत. तर त्यांनी एक प्लान बनवला व ठरवल की सिक्कीम मधील राजाच शासन कसं कमजोर करायच आणि आणि राजाला कमजोर करायच. त्यांनी सर्वप्रथम तेथील राजकीय पक्षांना मजबूती देण्याच ठरवलं व त्यानंतर तेथील संसदेमध्ये बहुमत आणून असा प्रस्ताव पास करायचा की सिक्कीम भारतामध्ये सामील करायच. हा प्लान इंदिरा गांधी यांना आवडला व त्यांनी याला मान्यता दिली व RAW च्या मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना सिक्कीम मध्ये पाठवल जात. सिक्कीम ला भारतामध्ये मिळवण्याच एक मोठ कारण म्हणजे तेथील राजा पलडेंग नामग्याल यांनी दुसर लग्न केल होत . त्यांची पत्नी ही एक अमेरिकन होती. तीच नाव होप कोक असं होत . व ती CIA ची एजंट असल्याच भारतीय गुप्तचर संघटनांना समजत. त्या बायको चा सिक्कीम च्या आंतरिक गोष्टीमध्ये जास्त हस्तक्षेप वाढत चालला होता.

त्यानंतर अजित डोवाल यांना सिक्कीम मध्ये पाठवल जात व तेथे असा ग्रुप बनवतात की जो सिक्कीम मध्ये भारताबद्दल चांगल्या गोष्टी पसरतो. तिथल्या लोकांना समजावून सांगतो की तुम्ही लोकशाही अशा भारतामध्ये सामील सामील झाल्यास काय फायदे होतील. अजित डोवाल सिक्कीम मधील सिक्कीम नॅशनल कॉंग्रेस या पक्षाचे प्रमुख काझी दाऊर्जि यांना समर्थन देण्यास सुरवात करतात. व सिक्कीम मधील सर्व छोट्या छोट्या पक्षांना या सिक्कीम नॅशनल कॉंग्रेस मध्ये सामील करतात. खूप साऱ्या जनतेला सिक्कीम नॅशनल कॉंग्रेस पार्टी च्या सपोर्ट मध्ये आणतात. त्याचबरोबर 1974 मध्ये सिक्कीम मध्ये निवडणुका होतात व सिक्कीम नॅशनल कॉंग्रेस या पक्षाला बहुमत मिळते. व या पार्टीचे प्रमुख काझी दाऊर्जि यांना सिक्कीम च पंतप्रधान बनवल जात. त्यानंतर च्या काळात सिक्कीम चा राजा व पंतप्रधान यांच्या मध्ये तनाव वाढत गेला. व शेवटी सिक्कीम च्या पंतप्रधानांनी भारताला हस्तक्षेप करण्याची विनंती केली. व भारत सरकार ने सिक्कीम मध्ये सैन्य पाठवल व सिक्कीम ला सुरक्षित केल्यानंतर तिथे जनमत निवडणूक घेतली व त्यामध्ये 95% लोकांनी भारतामध्ये सामील होण्याच्या बाजूने मत दिले. याचबरोबर 16 मे 1975 मध्ये सिक्कीम ला भारतामध्ये सामील केले. या सर्व कामामध्ये अजित डोवाल यांनी खूप मोठी भूमिका निभावली.

मणिपूर हिंसेच मुख्य कारण पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Letest Posts

अजित डोवाल आणि खालीस्तान | AJIT DOVAL ON KHALISTAN |

ही कहाणी आहे पंजाब ची 1980 च्या दशकात पंजाब मध्ये खालीस्तानी आतंकवाद्यांनी धुमाकूळ घालता होता. जनरल सिंग भिंडरावाले हा पंजाबला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळण्यासाठी मागणी करत होता. व त्याने पंजाब मधील हिंदूंना पंजाब सोडून जाण्याच आवाहन केल व कित्येक हिंदू लोकांना मारण्याच काम केल. पंजाब मधील एका शहरात पंजाब च्या राज्य परिवहन च्या बस मधील हिंदू लोकांना वेगळ करून त्यांची हत्या करण्यात आली. त्याच काळात सुवर्णमंदिरामध्ये काही खालीस्तानी आतंकवाद्यांनी कब्जा केला व सरकार ने त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले व ऑपरेशन ब्ल्यु स्टार ची सुरवात झाली. ऑपरेशन ब्ल्यु स्टार साठी भारतीय सेनेला सुवर्णमंदिरामध्ये रवाना केल गेल. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुवर्णमंदिरातील लपलेल्या खालीस्तानी आतंकवाद्यांना सुवर्णमंदिरामधून बाहेर काढण्यासाठी सेनेला सुवर्णमंदिरामध्ये घुसण्याची व फायरिंग करण्याचा आदेश दिला. त्यानुसार सेनेने ऑपरेशन ब्ल्यु स्टार च्या सहाय्याने दोन दिवस सतत हल्ला करून सुवर्ण मंदिरामधील खालीस्तानी आतंकवाद्यांना बाहेर काढल. या मध्ये सुवर्ण मंदिराच खूप नुकसान झाल.

या नंतर पुन्हा 4 वर्षानंतर याच सुवर्णमंदिरामध्ये पुन्हा एकदा खालीस्तानी आतंकवाद्यांनी कब्जा केला. सन जून 1984 मध्ये ऑपरेशन ब्ल्यु स्टार झाल्या नंतर पुन्हा एकदा सन 1988 मध्ये खालीस्तानी आतंकवाद्यांनी सुवर्णमंदिरामध्ये पुन्हा एकदा कब्जा केला व सरकार ला सुवर्णमंदिर खाली करण्यासाठी काय करावे हे सुचेना कारण या आधी एकदा सुवर्णमंदीरामधील आतंकवाद्यांना बाहेर काढण्यासाठी इंदिरा गांधी यांनी ज्या प्रकारे सैन्य पाठवून एक प्रकारे सुवर्णमंदिरावर हल्ला केल्यामुळ सुवर्णमंदिराचे खूप नुकसान पण झाले होते. याच कारणाने इंदिरा गांधी यांची हत्या पण झाली होती. त्यामुळे या वेळी सरकार थोडे जपून पावले टाकत होते. कारण पुन्हा सिख बांधवांच्या भावना दुखावून सरकार सिख समुदायाची नाराजी ओढवायची नव्हती.

या वेळी मात्र सरकार ने NSG च्या मदतीने सुवर्णमंदिराला खाली करायच ठरवल पण प्रश्न असा होता की , सुवर्णमंदिरामध्ये असलेले आतंकवादी किती आहेत. त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारची हत्यार आहेत. याची माहीती कशी घ्यायची हा प्रश्न सरकार पुढे उभा राहिला. या वेळी पुन्हा अजित डोवाल यांना पाचारण केल गेल व त्यांनी पुढील कामामध्ये जासुस बनून सुवर्णमंदिरामध्ये घुसण्याच ठरवल. हे ठरवल तितक सोप नव्हत कारण सुवर्णमंदिरामध्ये जाणे म्हणजे मृत्यूच्या दाढेत जाण्यासारखे होते, पण अजित डोवाल यांनी माघार नाही घेतली. त्यांनी सुवर्णमंदिराच्या बाहेर एका रिक्षाचालकाचा वेश धारण करून तेथे फिरण्यास सुरवात केली. अजित डोवाल हे त्या ठिकाणी असलेल्या लोकांशी मॅच होत नसल्याने खालीस्तानी आतंकवाद्यांना त्यांच्यावर शक आला तर त्यांनी त्यांना पकडून त्यांच्या कब्जा मध्ये नेल व विचारपूस केली. या वेळी अजित डोवाल यांनी त्या आतंकवाद्यांना असं भासवल की ते ISI या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचे जासुस आहेत व ते त्यांच्या मदतीसाठी आले आहेत. असे बोलून त्या आतंकवाद्यांना डोवालांनी विश्वासात घेतले व काही दिवसांनी त्यांना सुरक्षा यंत्रणापुढे शरण जाण्यास मजबूर केल व त्यांच्या मनावर इतका परिणाम केला की कित्येक आतंकवाद्यांनी लढणे सोडून साईनाईड खाऊन आत्महत्या केल्या. आणि याच ऑपरेशनला आपण ब्लॅक थंडर या नावाने ओळखतो. अशाप्रकारची कित्येक साहसी कामे अजित डोवाल यांनी सेवा देताना केली आहेत.

अजित डोवाल यांच्याबद्दल च्या अजून राहिलेल्या कहाण्या वाचायच्या असतील तर नक्की कमेन्ट करा. लवकरच घेऊन येऊ !

अजित डोवाल माहिती | अजित डोवाल |

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *