- आपल्या आधारकार्डला मोबाईल नंबर लिंक आहे. कि नाही ?
- आपले आधार Biometric Data अपडेट आहे की नाही ?
- आपल्या आधारला दहा वर्ष पूर्ण झाली की नाही ?
- आपले आधारकार्ड चालू आहे की नाही ?
या सर्व प्रश्नाची उत्तरे व त्या वरील उपाय या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत.
सर्वप्रथम मोबईल मध्ये Gogoole Chrome वरती My Aadhaar सर्च करा. त्यानंतर जी पहिली वेबसाइट येईल त्या वेबसाइट वरती क्लिक करावे.

त्या नंतर My Aadhaar वरती क्लिक करावे. त्या नंतर खालील प्रमाणे पेज ओपन होईल .

त्या नंतर My Aadhaar मध्ये जाऊन

वरील प्रमाणे Check Aadhaar Validity या वर क्लिक करावे.

त्या नंतर Enter Aadhaar Number येथे आधार नंबर टाकावा. व खाली दिलेल्या Enter Captcha येथे दिलेला Captcha code टाकावा त्या नंतर Proceed वरती क्लिक करून आपल्या आधारची Validity पहावी.
त्याचे स्पष्टीकरण खालील प्रमाणे .

जर वरील प्रमाणे माहिती दिसली तर आधार मध्ये कोणता मोबाईल नंबर लिंक आहे. त्या नंबरचे शेवटचे 3 अंक दिसतात. तो मोबाईल नंबर आपल्याकडे चालू आहे. की नाही तो पहा तो नंबर जर नसेल तर नवीन नंबर लिंक करून घ्या.

जर वरील प्रमाणे null असे आले तर आपल्या आधारकार्डला कोणताही मोबईल नंबर लिंक नाही असे समजायचे.

जर वरील प्रमाणे This Aadhaar number requires Document (Proof of Identity-POI document & Proof of Address-POA) update. Please upload the documents through https://myaadhaar.uidai.gov.in or visit nearby Aadhaar Seva Kendra. असे शो झाले तर समजायचे की आपल्या आधारकार्डला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. आपल्या आधार मध्ये कागद पत्रे अपडेट करावी लागतील. त्यालाच Documents Update असे म्हणतात.

जर वरीलप्रमाणे Aadhaar number xxxx xxxx 0028 has been cancelled under regulation 27 of the Aadhaar (Enrolment & Update) Regulations, 2016 असे शो झाले तर समजायचे की आपले आधारकार्ड हे बंद झाले आहे. त्यासाठी 1947 या नंबर वरती कॉल करून त्यांना ही समस्या सांगावी ते त्यावर उपाय सांगतील.

जर वरीलप्रमाणे This Aadhaar number requires Mandatory Biometric Update. Please visit nearby Aadhaar Seva Kendra / Aadhaar enrollment- update center. असे शो झाले तर समजायचे की आपल्या आधार मध्ये Biometric Data Update करणे गरजेचे आहे. ते आपण अपडेट करून घ्यावे.
https://myaadhaar.uidai.gov.in/check-aadhaar-validity/en येथे क्लिक करून तुम्ही सरळ आधार च्या वेबसाइट वरती येऊ शकता.
https://ilovepathardi.co.in/aadhar-update-c-o-and-address-online/ येथे क्लिक करून आधार विषयी अजून जाणून घ्या.