भगवान गड | Bhagwan gad | bhagwangad mandir |

श्रीक्षेत्र”भगवानगड” हे महाराष्ट्र राज्यातील बीड-अहमदनगर जिल्ह्यांतील, सीमेवर असलेल्या, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेले निसर्गरम्य देवस्थान आहे. या निसर्गरम्य देवस्थानलगतच राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते विशाखापटणम हा जातो.
महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र भगवानगड हे ओळखले जाते. या ठिकाणी विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे मंदिर आहे. तसेच जनार्दनस्वामी, भगवानबाबा व भीमसिंह महाराज यांच्या समाध्या येथे आहेत.
सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिले जाते. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून श्री क्षेत्र भगवानगडाकडे बघितले जाते.
हा गड वंजारी संत भगवानबाबा यांनी बांधला आहे. भगवानबाबा हे थोर वारकरी संप्रदायाचे संत होते. भगवानबाबांच्या निधनानंतर राजपूत समाजाचे संत भीमसिंह महाराज गादीवर बसविले. आता वंजारी समाजाचे महंत श्री डाॅ नामदेव महाराज शास्त्री गादीवर बसविले आहेत. हे भगवागडचे वैशिष्ट्य आहे की येथे योग्यता असेल तर जातपात पाहिली जात नाही.
या ठिकाणाच्या प्राचीन इतिहासाविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की येथे सप्तर्षींनी तपश्चर्या केली होती. पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे या भागात वास्तव्य असल्याचा उल्लेखही काही पुराणांमध्ये आहे. धौम्य ऋषींच्या पादुका असलेले हे ठिकाण ‘धौम्यगड’ किंवा ‘धुम्यागड’ म्हणून ओळखले जात होते. येथील धौम्य ऋषीच्या मंदिराचे अस्तित्व काही हजार वर्षांपूर्वीपासून असल्याची नोंद आहे.
भगवान बाबांवर इंग्रजांचा खबरी असण्याचा आरोप झाला होता. जाणून घ्या !
भगवान गड जुना फोटो | Bhagwan Gad Old Photo | Bhagwan Gad Images |
या प्राचीन मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. याचबरोबर रंग ऋषी, भारद्वाज ऋषी, शृंगी ऋषी, पराशर ऋषीचे यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण. हे ठिकाण सदगुरू जनार्दनस्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. यानंतर दुर्दैवाने अनेक वर्षे धौम्यगड दुर्लक्षित असल्याने जुने अवशेष तसे फार कमी आहेत. या जवळच काशी केदारेश्वराचे मंदिर, हरिहरेश्वराचे भव्य मंदिरे आहे.
काशी केदारेश्वराचे मंदिर नागलवाडी परिसरात आहे.
हे ठिकाण राम लक्ष्मण आणि सीता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. येथे सीतेचा संसार असल्याचे सांगितले जाते. येथे अनेक मोठे जाते, रांजण आहे. सीतेला तहान लागली म्हणून रामाने येथे रामबाण चालवले असल्याचा उल्लेखही काही पुराणांमध्ये आहे. येथे मुख्य उत्सव श्रावण सोमवारला सुरू होतो.
धौम्यगडाचा जीर्णोद्धार:
यानंतर ह्या धौम्यगडाचे ऐतिहासिक महत्त्व जाणून श्री संत शिरोमणी ह.भ.प. भगवानबाबा येथे वास्तव्यास आले आणि भक्तांच्या प्रेमाग्रहाखातर तेथेच विसावले. येथे भगवानबाबांनी धौम्य ऋषीच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांच्या अथक धाडसीवृत्ती आणि लोकसहभाग यातून भक्तीचा गड उभारणीचे काम सुरू झाले आणि गडाचे भाग्य उजळले. भागवत धर्मच्या भगवा फडकला. बाबा स्वतः वास्तुशास्त्रात निपुण होते. विशेष म्हणजे गडाचे संपूर्ण बांधणी पाषाणात असून लाकडाचा वापर न करता केलेले आहे. ओवऱ्यासाठी नवगण राजुरी येथील राजूबाईच्या डोंगरावर हजारो वर्षापासून पडलेल्या पाषाणखांडे आणले होते. सर्व पाषाणखांडे बैलगाडीने आणले गेले आणि त्यांनी चौकोनी चीर्यांचे रूप दिले गेले. त्यामुळे बांधकाम भक्कम झालेले आहे. स्वतः भगवानबाबा आजूबाजूच्या परिसरात फिरून गडाच्या बांधकामासाठी आवाहन करत होते.
भगवानबाबाला तन-मन-धनाने काम करणारे भक्तगण भेटले. त्यांना तसा प्रतिसादही मिळत होता. गड उभारणीच्या कामाला आजूबाजूच्या परिसरातील भक्तगणांनी भरभरून मदत केली. स्त्रियांनी स्वतःचे दागदागिने, अलंकार, आभूषणे दिली आणि बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला. प्रत्येक भक्तगण या कार्याला हातभार लावत होते. भक्तगणांनी घरून स्वतःच्या भाकरी-भाजी आणून, रात्रंदिवस गडाचे बांधकाम पार पाडले. पाहता पाहता भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड ही अत्यंत विस्तीर्ण प्रचंड भव्य वास्तू नावारूपास आली. उत्कृष्ट वास्तुशिल्पकलेचा हा एक अलौकिक आविष्कार आहे. त्यांच्या संकल्पनेतूनच धौम्यगडाचा जीर्णोद्धाराची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ ही रोवली गेली व भक्तीचा गडाची स्थापना झाली. त्यानंतर खऱ्या अर्थाने धौम्यगडाचा कायापालट झाल्याचे पहावयास मिळाले. त्यांनी रस्त्यांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकत रस्ता विकास करण्यावर भर दिला. भक्तांना एकत्र करून श्रमदानाने भगवानगड ते पायथ्याच्या खरवंडी गाव रस्ता करण्याचे काम पूर्ण झाले.
नवीन माहिती
- वंजारी समाजातील गोत्र व वंशावळी (vanjari matrimony)
- PVC आधार कार्ड ऑनलाईन कसे ऑर्डर करावे ते पण फक्त 50 रुपयात
- 1947 ते 1960 च्या दरम्यान आपला महाराष्ट्र कसा होता. जाणून घ्या
- आपले आधार कार्ड अपडेट आहे कि नाही ते पहा 5 मिनिटात. ते ही मोफत.
- आधारकार्ड वरील पत्ता व C/O care of बदला घरबसल्या फक्त 50 रुपयात.
पुढे इ.स. १९५८ मध्ये स्वामी सहजानंद सरस्वती, ह.भ.प. मामासाहेब दांडेकर आणि बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीची देवळात प्रतिष्ठापना केली. गडाचे उद्घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १ मे १९५८ रोजी झाले. यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बोलताना म्हणाले की, ‘‘धर्मरक्षणासाठी भगवानबाबांनी भक्तांना एकत्र करून शास्त्राच्या आधाराने भक्तीचा गड उभारण्याचे काम केले आहे. आजपासून धौम्यगड हा भगवानगड म्हणून ओळखला जावा.’’ तेव्हापासून धौम्यगडाचे नाव भगवानगड असे पडले. याचवेळेस बाबांच्या संकल्पनेतून भगवान विद्यालयाने आकार घेतला. शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून गडावर भगवान विद्यालयाची कोनशिला बसविली आहे. वाड्या, पाड्या, तांड्यांवरील मुले या ठिकाणी शिक्षणासाठी आहेत.
bhagwangad sansthan | bhagwangad fort | bhagwangad ahmednagar |
मंदिराचे बांधकाम:
श्रीक्षेत्र भगवानगड येथील मंदिर चार मुख्य मंदिरांचा समूह आहे. यांतील विठ्ठलाचे मुख्य मंदिर मध्यावर असून सभोवतीची असणारी मंदिरे धौम्य ऋषी आणि महारुद्र हनुमान यांची आहेत. विठ्ठल व भगवानबाबा यांच्या मंदिरांची उंच शिखरे व त्यांवरील कळस हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. विठ्ठलाचे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मंदिरावरील कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. आत दगडी कासव आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या द्वारातून आत गेल्यानंतर मंदिरासमोर भव्य उंच सभामंडप लागतो. या सभामंडपात प्रत्येक कोपऱ्यात पूर्ण अखंड स्तंभ आहेत.
या मंडपातील शिल्पांकित स्तंभ अत्यंत कल्पकतेने उभारलेले आहेत. या स्तंभावर मजबूत घुमटाकार छत आहे. सभामंडप ते गाभाराप्रवेश दरम्यान दोन्ही बाजूंना ओटे आहेत. मंदिरात सभामंडपजवळच गाभाराप्रवेश आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी गणपतीची मूर्ती आहे. सभामंडपात सभोवार अरुंद फरसबंद रस्ते आहेत. पाषाण घडवून एकावर एक बसवून मंदिराच्या भिंती उभारल्यामुळे कोरीव काम स्पष्ट व टिकून राहिले आहे. या जवळच धौम्य ऋषीचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये पाचही पांडव, पांडवांची पत्नी द्रौपदी व धौम्य ऋषी यांच्या मूर्ती आहेत. या मंदिरातील प्रत्येक मूर्ती अतिशय देखणी सुंदर कोरीव काम असलेल्या असून त्या प्राचीन कलावैभवाची साक्ष देणारा एक अद्वितीय नमुना म्हणावा अशीच आहेत. या मूर्ती पांढरे शुभ्र संगमरवरी वस्त्र नेसलेल्या आहेत. धौम्य ऋषींच्या मंदिराच्या बाजूला जनार्दनस्वामी यांची एक छोटेशी समाधी भग्नावस्थेत अजूनही उभी आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजासमोरच एका बाजूला महारुद्र हनुमानाचे पुरातन मंदिर आहे.
मध्यप्रदेश च्या शिंदे राजघराण्यातील नवसाला पावणारी मोहटादेवी जाणून घ्या !
वंजारी समाजाबद्दल जुना इतिहास काय आहे? जाणून घ्या !
महंत वै. भगवान बाबा आणि पुर्व पीठिका :-
आबाजी तुबाजी सानप प्रचलित नाव श्री संत भगवानबाबा (जन्म : २९ जुलै, इ.स. १८९६ मृत्यू : १८ जानेवारी, इ.स. १९६५ ) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत आहेत.
भगवानबाबा हे महाराष्ट्रातील वंजारी जातीत जन्मले होते. त्यांच्या आईचे नाव कौतिकाबाई आणि वडिलांचे नाव तुबाजीराव सानप असे होते. तुबाजीराव सानप यांच्या घरात पाटीलकी होती, म्हणून ते आडनावाच्या पाठीमागे पाटील असे उपनाम लावीत. घराण्यात अनेक पिढ्यांपासून विठ्ठलभक्ती आणि पंढरपूरची वारी होती. त्यांच्या घराण्याचे मूळ गाव नगर जिल्ह्यातील शिकरडीपारडी होय; पण त्यांचे पूर्वज बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यांतल्या सुपे घाट सावरगाव या गावी स्थायिक झाले होते.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यांतल्या सुपे घाट सावरगाव येथे श्रावण कृष्ण पंचमी, शके १८१८ (२९ जुलै, इ.स. १८९६), सोमवार रोजी सूर्योदयाच्या समयी भगवानबाबांचा जन्म झाला. बारशाच्यावेळी मुलाचे नाव ‘आबा’ किंवा ‘आबाजी’ ठेवण्यात आले. त्यामुळे भगवानबाबांचे पूर्ण नाव आबाजी तुबाजी सानप. ते कौतिकाबाई आणि तुबाजीराव यांचे पाचवे अपत्य होते.
गावात चौथीपर्यंत शाळा होती. तेव्हा गुरुजींच्या सांगण्यावरून पुढील शिक्षणासाठी त्यांना त्यांच्या मामाच्या गावी लोणी, ता. शिरूर, जि. बीड येथे पाठवले गेले. अधिक शिक्षणसोयी नसल्याने आबाजी पुन्हा गावाकडे परत आला. ग्रामीणभागात रीतीरिवाजानुसार गुरेढोरे राखायला जात. आबाजीला शेती व गुरांची निगराणी राखायला फार आवडत असे. घरात धार्मिक वातावरण असल्यामुळे उपजतच आबाजीला आध्यात्मिक ज्ञानाची व विठ्ठलनामाची आवड निर्माण झाली. आबाजी घरी शेतीकाम सांभाळून विठ्ठलभक्ती करीत असे. त्यांनी पंढरपुर दिंडीस जाण्यास सुरुवात केली. दिघुळ येथील प्रख्यात वारकरी गितेबाबा यांच्या सोबत प्रथम दिंडीस गेले. ‘पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन झाले तर जीवनाचे कल्याण होते’ अशी त्यांच्या परिवारात आणि आसपासच्या समाजात समजूत असल्याने त्यांनी गीतेबाबा दिघुळकरांसोबत पंढरपूरची वारी केली. त्यासाठी ते वयाच्या ५-६व्या वर्षी घर सोडून पायी चालत पंढरपूरला गेले.
पहिल्या वारीच्या शेवटीच पंढरपुरात पोहोचल्यावर त्यांनी संपूर्ण जीवन विठ्ठलचरणी अर्पण करण्याचे ठरविले. त्यांनी गीतेबाबानाच आध्यात्मिक गुरू मानले. पंढरपूरच्या वारीवरून गावी परतल्यावर आबाजी घरी परत गेला नाही. गावातील हनुमान मंदिरात जाऊन बसला. घरच्यांना ही बातमी कळताच ते मंदिरात आले. तेव्हा लहान आबाजीने तुळशीमाळ घालण्यासाठी आग्रह केला. लहान आबाजीचे भगवंताविषयी असलेले प्रेम पाहून घरच्यांनी आग्रह स्वीकारला आणि नंतर आबाजी घरी परत आला.
आबाजीचे पूर्वज हे लहानपणापासून नारायणगडाचे उपासक होते. नारायणगडाचे महंत हे त्यांचे वंशपरंपरागत गुरू होते. तत्कालीन नारायणगडाच्या गादीवर माणिकबाबा होते. आबाजीचे आईवडील नेमाने माणिकबाबाच्या दर्शनासाठी नारायणगडावर येत.
एकदा आबाजीचे आईवडील त्याला घेऊन विजयादशमीच्या दिवशी नारायणगडावर आले. आबाजीने माणिकबाबांना गुरुपदेश द्या असे म्हटले. त्यावर अल्पवयात गुरुपदेश देता येत नाही असे माणिकबाबा म्हणाले, पण आबाजीच्या मनाचे समाधान झाले नाही. माणिकबाबांनी घेतलेल्या शिष्यत्वाच्या परीक्षेत आबाजी उत्तीर्ण झाले म्हणून माणिकबाबांनी आबाजीला अनुग्रह दिला आणि गुरुपदेश केला. नंतर माणिकबाबांनी आबाजीचे नाव ‘भगवान’ ठेवले.
असे सांगितले जाते की पंढरपुरला गेल्यानंतर तेथेच त्यांची भेट नारायणगड येथील माणिकबाबांशी झाली व ते सांप्रदायिक शिक्षणासाठी नारायणगडी गेले. माणिकबाबा हे त्यांचे गुरू होय. त्यानंतर भगवानबाबा पुढील शिक्षणासाठी आळंदीतील ह.भ.प. श्री बंकट स्वामी यांच्याकडे गेले. त्यानंतर ते पुन्हा नारायणगडावर आले. त्यावेळी भगवानबाबांचे वय २१ वर्षे होते. त्यानंतर भगवानबाबा नारायणगडाचे महंत झाले व त्यांनी तेथे वारी, नारळी सप्ताह असे अनेक धार्मिक कार्यक्रम राबवले.
भगवानबाबांची वेशभूषा तत्कालीन जनसामान्य लोकांसारखीच होती. त्यांची राहणी साधी व विचारसरणी उच्च होती. श्री संत भगवानबाबा पांढरेशुभ्र साधे धोतर, पांढराशुभ्र सदरा, पांढरा फेटा वापरत. कधी गुडघ्यापर्यंत पोचणारा कोट घालत. रुंद, भव्य कपाळ, कपाळावर गंध, गळ्यात तुळशीमाळ हाच त्यांचा थाट होता. रुबाबदार मिशा, भव्य देहयष्टी, उंचेपुरे, तेजस्वी कांती व गौरवर्ण यांमुळे ते भारदस्त वाटत. हातांत काठी, पायात चप्पल किंवा बूट असे. ते शिस्तीचे तसेच उत्तम मनुष्यपारखी होते.
भक्तिमार्गप्रसाराचे कार्यः
भगवानबाबांनी भक्तिमार्गप्रसाराचा यज्ञ सुमारे इ.स.१९१८ साली चेतवला. त्यांनी आयुष्यभर भक्तिमार्गप्रसाराचे अस्मितेचा अंगार पेटता ठेवला. महाराष्ट्राच्या लाखो माणसांचे भगवानबाबा प्रमुख आधारस्तंभ होते तर वारकरी संप्रदायाचे तारणहार होते. भगवानबाबांची सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक विचारांची बैठक एका श्रेष्ठ कृतिशील समाजसुधारकाची होती. त्यांनी असंख्य भाविकांना व्यसने, दुराचरण, दुरभिमान, कलह यांपासून सोडविले. गोरक्षण, अन्नदान, वैदिक अनुष्ठान, नामस्मरण, भजनसप्ताह, तीर्थयात्रा अशारीतीने भाविकांमध्ये धर्माबद्दल व भक्तीबद्दल जागृती केली.
भगवानबाबांनी समाजात समता, बंधुता, एकात्मता, जागृती, हरिनामाची गोडी स्थापन करण्यासाठी रुजविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या कीर्तनात विठ्ठलावरील प्रेम, भक्तिभाव व भावसामर्थ्य ओतप्रोत भरलेले दिसत असे. त्यांचे कीर्तन सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडत असे. त्यांच्या कीर्तनाने भाविक भारावले जात असत. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी भागवत धर्म व वारकरी संप्रदाय प्रसाराचे कार्य केले. भगवानबाबांनी वारकरी संप्रदायात राहून समाजपरिवर्तनाचे काम केले. भरकटलेल्या समाजाला शिक्षित करण्यासाठी भगवानबाबांनी गावागावांमध्ये वार्षिक नारळी हरिनाम सप्ताह सुरू केले.
भगवानबाबा गावागावांमध्ये हिंडून सर्व स्तरांशी संपर्क साधून त्यांच्या बोलीत हृद्यसंवाद साधणारे आदर्श भक्तवात्सल्य पंथप्रसारक होते. त्यांनी भाविकांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. त्यांनी धर्माच्या वचनांचा खरा अर्थ सांगून भाविकांना सन्मार्गाला लावले. त्यांनी कीर्तनद्वारे भगवंताच्या नामस्मरणभक्तीचा संदेश सर्वत्र पसरवला.
मराठेशाहीच्या अस्तानंतर एखाद्या झंझावाताप्रमाणे बाबा अवतरले व भागवत धर्माचा वारसा त्यांनी पुढे चालवला. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनात स्वाभिमानाचे, धर्मचळवळीचे स्फुर्ती चेतवण्याचे काम केले. त्यांच्या वारकरी संप्रदायातील योगदानामुळे कारकिर्दीलाही वेगळा आयाम प्राप्त झाला होता व त्यांनी स्वतःची अशी एक पकड सामान्य माणसांवर निर्माण केली होती. भागवत धर्मावरील निजामाचे आक्रमण कारणीभूत आहे अशी खात्री बाळगून भगवानबाबा यांनी कीर्तनांच्या माध्यमातून लक्ष्य करण्यास सुरुवात केली व त्यातूनच धर्मचळवळ जन्मास आली. केवळ आपल्या कीर्तनांद्वारे आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून महाराष्ट्रावर जबर पकड बसविण्याच्या बाबांच्या व्यक्तिमत्त्वातील लौकिक गुण याची इतिहासाला अत्यंत गौरवाने दखल घ्यावी लागली.
भगवान बाबांवर इंग्रजांचा खबरी असण्याचा आरोप झाला होता. जाणून घ्या !
bhagwangad mahant | भगवान गड महंत | bhagwangad maharaj |
गादीचे उत्तराधिकारी :
नामदेवशास्त्री सानप हे महाराष्ट्रातील एक संत, प्रवचनकार व कीर्तनकार आहेत. भीमसिंह महाराजच्या मृत्यूनंतर भगवानगडावरील गादीचे उत्तराधिकारी म्हणून त्यांनी भगवानगडाची जबाबदारी सांभाळत आहेत. भगवानबाबाचा वारसा पुढे चालू ठेवत त्यांनी तेथील मंदिराचा मोठा विकास केला आहे.