नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच आपल्या I Love Pathardi च्या वेबसाइट वर, मित्रांनो अशाच प्रकारच्या अजून अपडेट साठी तुम्ही आपल्या टेलेग्राम चॅनलला फॉलो करू शकता.

राज्य शासनाने सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. खरंतर सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड दोन्ही जमिनीचे महत्त्वाचे कागदपत्रे आहेत. या कागदपत्रांवरून जमीन कोणाच्या नावावर आहे, जमिनीवर कुठला बोजा आहे का, यांसारखी सर्व माहिती मिळते. अशा परिस्थितीत हे कागदपत्रे नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत.
7 12 utara maharashtra edit online
दरम्यान या कागदपत्रांमध्ये काही चूक असल्यास ती दुरुस्त करावी लागते. खरतर जमिनीची खरेदी, बक्षीस पत्र, मृत्युपत्र, दत्तक पत्र, हक्क सोड, वारसा, बोजा नोंद इत्यादी फेरफार नोंदी कराव्या लागतात. अनेकदा या नोंदी करताना मात्र काही चुका होतात. यामुळे या चुका दुरुस्त कराव्या लागतात. जर यातील चुका दुरुस्त करण्यात आल्या नाहीत तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात.
ई-पीक पाहणी करा नाहीतर शेत पडीक समजल जाईल
सातबारा दुरुस्ती अर्ज
मिळकतीबाबतचे वादविवाद निर्माण होतात. अशा परिस्थितीत या चुका दुरुस्त करण्यासाठी आतापर्यंत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1967 च्या कलम 155 अन्वये तहसीलदार अथवा उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागत असे. मात्र ऑफलाइन पद्धतीने हे काम करताना नागरिकांचा बहुमूल्य असा वेळ वाया जातो.
शिवाय या कामासाठी अनेक भागात नागरिकांची आर्थिक पिळवणूक देखील केली जाते. मात्र आता सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड मधील या चुका दुरुस्त करण्यासाठी केला जाणारा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे. यासाठी महा-ई-सेवा केंद्राद्वारे नागरिकांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. ही ऑनलाईन अर्जाची सुविधा आजपासून अर्थातच एक ऑगस्ट 2023 पासून नागरिकांसाठी सुरू केली जाणार आहे
या ऑनलाइन सुविधामुळे आता सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड मधील दुरुस्ती वेळेत होणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल शिवाय नागरिकांची होणारी आर्थिक पिळवणूक देखील थांबणार आहे. आता सातबारा उतारा आणि प्रॉपर्टी कार्ड मधील चुका दुरुस्त करण्यासाठी कोणत्याच शासकीय कार्यालयात नागरिकांना जागे लागणार नाही.
पूर्वीच्या काळात हस्तलिखिताद्वारे अथवा टायपिंगमधील चुकांमुळे सातबारा उताऱ्यावर नाव, क्षेत्रांमध्ये झालेली चूक आता बदलणे शक्य होणार आहे. त्यासाठी जमीनमालकांना त्यांच्या सातबाऱ्यातील दुरुस्तीसाठी आता ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. आज, मंगळवारपासून राज्यभर ही सुविधा सुरू होणार आहे.
१ रु. पीक विमा अर्ज भरण्यासाठी 3 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
सातबारा दुरुस्ती अर्ज ऑनलाइन
जमाबंदी आयुक्तालयाने राज्याच्या महसूल विभागाकडे संगणकीकृत अथवा हस्तलिखित सातबारा उतारे दुरुस्तीचा प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. राज्यात आजमितीला दोन कोटी ६२ लाख सातबारा उतारे तयार आहेत. त्यात संगणकावर टायपिंग करताना किंवा पूर्वी हाताने लिहिताना चुका होण्याची शक्यता अधिक असते. त्यातील चुका झाल्यास त्या दुरुस्त करता येणे शक्य आहे. चुका झालेल्या किंवा दुरुस्ती राहून गेलेले सातबारा उतारे दुरुस्ती करण्याचे अधिकार तहसीलदारांना दिले आहेत.
7/12 दुरुस्ती कशी करायची ?
सातबारा दुरुस्तीसाठी आलेले अर्ज तहसीलदारांच्या पातळीवर प्रलंबित आहेत. त्यांना गती मिळाल्याचे दिसत नाही. लिखित स्वरूपात दिलेल्या अर्ज प्रक्रियेमुळे ते प्रलंबित राहिले आहेत. आता ऑनलाइन पद्धतीने दिलेले अर्ज किती स्वरूपात प्रलंबित आहेत, याचे रेकॉर्ड ठेवणे शक्य आहे. त्यामुळे ‘ई हक्क’ पोर्टलवर जाऊन नागरिकांनी सातबारा-फेरफार यावर क्लिक करून तेथे अर्ज करावा. त्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. त्यानंतर हा अर्ज संबंधितांकडे गेल्यानंतर तलाठी संबंधित कागदपत्रांचे पुरावे तपासून, त्याची पूर्तता करणार आहे. ती दुरुस्ती तहसीलदारांकडे मान्यतेसाठी पाठविली जाईल
राज्यात आतापर्यंत सुमारे पाच लाख अर्ज दुरुस्तीसाठी प्रलंबित आहेत. त्यापैकी एक लाख पाच हजार ११९ अर्ज ऑनलाइन पद्धतीने आले आहेत. त्यातील ५९ हजार २३० अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. ३९ हजार ६६० अर्ज हे त्रुटींची पूर्तता करण्यासाठी प्रलंबित आहेत. सहा हजार २२९ अर्ज तलाठ्यांकडे प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सातबारा दुरुस्तीच्या अर्जांचा आढावा घेण्याची सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. ऑफलाइन अर्जांची आता ऑनलाइन एंट्री करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.
- दुरुस्तीचा अर्ज प्रलंबित कोठे आहे याची माहिती घेणे शक्य होणार
- अर्ज प्रलंबित करण्याची कारणे कळणार
- अर्ज निकाली काढण्यातील दिरंगाई टाळता येणार
- अर्ज लपवून ठेवणे किंवा गहाळ होणार नाही
- अर्जावर सुनावणी घेणे शक्य होणार
राज्यात यापूर्वी ऑफलाइन सातबारा दुरुस्तीसाठी अर्ज आले आहेत. मात्र, ते अर्ज अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. ऑनलाइनद्वारे एक लाख अर्जांसह पाच लाख अर्ज दुरुस्तीसाठी प्रलंबित आहेत. त्यापैकी ऑनलाइन अर्जापैकी निम्मे अर्ज निकाली काढण्याच्या प्रक्रियेत आहेत. त्यामुळे ‘ई हक्क’ पोर्टलवर नागरिकांनी जाऊन तेथे सातबारा, फेरफार दुरुस्तीसाठी ऑनलाइन अर्ज करावा. – सरिता नरके, राज्य संचालक, माहिती तंत्रज्ञान, महसूल विभाग