माहितीBlogभक्तिशेती विषयक

बैल पोळ्या विषयी थोडीशी माहिती

बैलपोल हा सन श्रावणी महिन्याच्या श्रावणी आमवस्याला असतो. या दिवशी बैलची पूजा केली जाते. या दिवशी गावामधून बैलची मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकी मध्ये पाटलांचा बैलाला आधी मान दिल जातो. पाटलाचा बैल गावच्या वेशीमधून आधी निघतो व मग त्या पाठीमागून बाकीची बैल निघतात. या दिवशी बैलची खूप सजावट केली जाते. बैलच्या शिंगला हिंगोल दिला जातो. बैलाच्या पाठीवर झालर नाहीतर रंग दिला जातो काही लोक बैलाच्या अंगावर रंगाने नावे लिहितात.

   या दिवशी श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस असतो. म्हणून शेतकरी गावतील सर्व मंदिरात नारळ फोडून नैवदय दाखवला जातो. त्याच बरोबर शेतात ही नैवदय दाखवला जातो. 

      या दिवशी बैलाकडून काहीच काम करून घेतले जात नाही. कारण हा दिवस त्याच्या पूजेचा असतो. बैललाने वर्षभर दररोज बैल काम करत असतो. वर्षातील एकमेव आरामाचा दिवस म्हणजे बैल पोळा होय. बैलपोळ्याच्या अधल्या दिवशी बैलाची खांदे मळणी केली जाते. या दिवशी रात्री हळद व दुधाने बैलाचा खांद्याची मळणी केली जाते.

       बैल पोळ्याला प्रत्येकाकडे बैल असतो असे नाही. मग ज्यांच्याकडे बैल नाही असे लोक मातीचे बैल विकत आणून त्याची पूजा करतात.

2023 साली बैलपोळा हा सर्वजणी मिरवणूक न करता केला होता. कारण 2023 साली लम्पी या संसर्गजन्य रोगाची साथ होती त्यामुळे प्रशासनाने बैलपोळा सर्वजणी न करण्याचे आव्हान शेतकऱ्यांना केले होते. व त्याचे पालन प्रत्येक शेतकऱ्याने केल.

बैलपोळा सणा बद्दल काही पुराणी कथा आहेत. जसे की श्रीहरी विष्णु भागवंतांनी श्रीकृष्ण भगवंताच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. त्या वेळेस श्रीकृष्णाचे मामा कंस यांनी श्रीकृष्ण यांना मारण्याचा अनेक वेळ प्रयत्न केला किती तरी राक्षकांना श्रीकृष्णाचा वध करण्यासाठी पाठविले त्यातील एक राक्षस म्हणजे पोळासुर राक्षस कंसाणे पोळासुरला भगवंताचा वध करण्यासाठी पाठविले परंतु भागवंतांनी त्याचा वध केला तो दिवस होता श्रावण अमावसेचा. श्रावण अमावसेच्या दिवशी पोळासुराचा वध झाला म्हणून पोळा हा सण साजरा केला जाऊ लागला.

तसेच बैलपोळा सणविषयी अजून एक कथा सांगितली जाते. कैलासावर एकदा देवाधी देव महादेव आणि देवी पार्वती साडीपाट खेळत होते. त्यावेळ देवी पार्वती यांनी डाव जिंकला परंतु देवधी देव म्हणाले की हा डाव मी जिंकला आहे. आणि त्यावरुण दोघात वाद सुरू झाला. आणि या वादाला साक्षी होते. ते म्हणजे फक्त नंदी तेव्हा देवी पार्वती यांनी नंदीला विचारले की डाव कोणी जिंकला तेव्हा नंदी देवधी देव महादेव यांची बाजू घेतली. तेव्हा माता पार्वतीला राग आला. आणि तिने नंदीला शाप दिला की मृत्यूलोकी तुझ्या मानेवर जू बसेल तुला जन्मभर कष्ट करावे लागतील. हा शाप ऐकुन नंदील त्याची चूक समजली त्याला खूप वाईट वाटले त्याने देवी पार्वती माफी मागितली तेव्हा देवी पार्वती ने सांगितले की शेतकरी वर्षातून एक दिवस तुला देव मानून तुझी पूजा करतील त्या दिवशी तुझ्या मानेवर जू ठेवणार नाही. तेव्हा पासून हा बैल पोळा हा सण साजरा केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *